विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोव्यातल्या सध्याच्या काँग्रेसमधल्या घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस मधून पक्षांतर करून बाहेर पडलेल्या नेत्यांना “निर्लज्ज” अशा शेलक्या शब्दात संबोधले आहे. अशा “निर्लज्ज” नेत्यांना आम्ही शिवसेनेत घेत नसतो, असे त्यांना सुनावले आहे. In Goa, Raut called the “change of party” “shameless”; So what to say to all the parties that have gone from Mahayuti to Mahavikas Aghadi ??
संजय राऊत सध्या गोव्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या समवेत खासदार राहुल शेवाळे हे देखील आहेत. शिवसेनेने गोव्यात विधानसभेच्या 22 जागा लढविण्याचे जाहीर केले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांनी काँग्रेसला रामराम करून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा हात धरला आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे १० नेते देखील तृणमूल काँग्रेस मध्ये सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पक्ष बदलूंना “निर्लज्ज” असे संबोधले. एका पक्षातून निवडून यायचे आणि दुसऱ्या पक्षात जायचे असे दलबदलू “निर्लज्ज” असतात असे ते म्हणाले.
गोव्यातून उडी मारून दिल्लीत गेलेले अनेक नेते आपण पाहिले आहेत. पण या वेळची उडी गोव्यातून दिल्लीपेक्षा कोलकत्त्याला गेली आहे, असे खोचक उदगार संजय राऊत यांनी काढले.
पण एका महायुतीतून युतीतून निवडून येऊन दुसऱ्या महाविकास आघाडीत गेलेल्या अख्ख्या पक्षांना नेमके काय म्हणायचे…??, याचा खुलासा मात्र संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारला नाही. त्यामुळे त्यांनी तो केला नाही…!!
In Goa, Raut called the “change of party” “shameless”; So what to say to all the parties that have gone from Mahayuti to Mahavikas Aghadi ??
महत्त्वाच्या बातम्या
- अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेल्या मिरज दंगलीचा खटला ठाकरे- पवार सरकारकडून मागे; १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Letter to PM CM : पत्रास कारण की, आमचे दात येत नाहीयेत; चिमुकल्यांना मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांच भन्नाट उत्तर ; म्हणाले..
- शाळा सुरू करण्यापूर्वी लोकल प्रवासाचा प्रश्न सोडवा , शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
- Mumbai 26/11 Terror Attack : अर्णब गोस्वामीच्या डिबेट शोमध्ये-पाकिस्तानी दहशतवाद्यांनीच 26/11 हल्ला घडवून आणला- इम्रान खान यांच्या पक्षाची कबुली
- SWACHH BHARAT MISSION 2.0 : पंतप्रधान मोदींच्या हस्ते दोन मोहिमांचा शुभारंभ ; कोट्यवधी खर्च करुन नागरिकांना होणार मोठा फायदा ; वाचा काय आहे मोहिम…