• Download App
    Important instructions from the Central Government for planning gas supply; गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण सूचना; ग्राहकांनी भीती बाळगायचे नाही कारण!!

    गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण सूचना; ग्राहकांनी भीती बाळगायचे नाही कारण!!

    Central Government

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अमेरिका, इजराइल विरुद्ध इराण संघर्षामुळे जागतिक  बाजारावर मोठा परिणाम झालाय. या परिस्थितीचा फटका भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावरही जाणवत आहे.वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी गॅस कंपन्या आणि डिलर्स यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकीत ग्राहकांना त्रास होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचा योग्य वापर व्हावा यासाठी काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सूचनांमुळे वितरण पद्धतीत काही बदल होणार असल्याचेही समोर येत आहे.Important instructions from the Central Government for planning gas supply;

    गॅस वितरणात बदलाची तयारी

    अलीकडे झालेल्या डिलर्स बैठकीत गॅस वितरणाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गॅसचा साठा मर्यादित असल्याने पुरवठा व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी कंपन्यांनी वितरण प्रक्रियेत काही नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.



    यामध्ये दोन गॅस सिलेंडरच्या वितरणामध्ये किमान 21 दिवसांचे अंतर ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांनी एक सिलेंडर घेतल्यानंतर पुढील सिलेंडर मिळण्यासाठी 21 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे उपलब्ध गॅस अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

    ओटीपी प्रणाली अनिवार्य

    गॅस वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी ओटीपी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिलेंडर वितरण करताना ग्राहकांना ओटीपी सांगणे आवश्यक राहणार आहे. यामुळे बोगस ग्राहक किंवा गैरवापर ओळखणे सोपे होईल, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

    तसेच ग्राहकांनी शक्य तितक्या काटकसरीने गॅसचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता गॅसचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

    – व्यावसायिक सिलेंडर वितरणावर तात्पुरती मर्यादा

    सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणावर तात्पुरती मर्यादा घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे काही काळ व्यावसायिक वापरासाठी सिलेंडर पुरवठा मर्यादित राहू शकतो. यामागील उद्देश घरगुती ग्राहकांना प्राधान्य देण्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

    देशात सध्या गॅसचा पुरवठा मुख्यतः भारत सरकारच्या ‘भारत गॅस’, ‘एचपी गॅस’ आणि ‘इंडियन गॅस’ या तीन कंपन्यांकडून केला जाणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातूनच नियमित वितरण चालू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    खाजगी कंपन्यांचे वितरण थांबले

    दरम्यान काही खाजगी गॅस कंपन्यांचे वितरण सध्या थांबवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. ‘टोरंटो गॅस’, ‘रिलायन्स गॅस’, ‘महेश गॅस’ आणि ‘गो गॅस’ या कंपन्यांकडून होणारे वितरण सध्या बंद ठेवण्यात आले आहे. यासोबतच ग्राहकांनी घाबरून गॅस सिलेंडरचा अतिरिक्त साठा करू नये, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर लवकरच गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत होईल, अशी माहिती डिलर्स बैठकीत देण्यात आली.

    Important instructions from the Central Government for planning gas supply;

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran war effect : पेट्रोल डिझेलचे भाव नाही वाढणार, केंद्र सरकारचा निर्वाळा; गॅस पुरवठ्याच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण सूचना!!

    Anil Ambani : अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरच्या ठिकाणांवर ईडीचा छापा; सकाळ होण्यापूर्वीच १५ पथके पोहोचली

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- आपण विभागलेले आहोत, म्हणून हल्ले होत आहेत; भेदभाव आणि स्वार्थाला तिलांजली द्या