• Download App
    शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त100 रुपयांत आनंदाचा शिधा|Important decision of Shinde-Fadnavis government Anandacha Shidha For Ration Card Holder On the occasion of Gudipadwa, Dr Babasaheb Ambedkar Jayanti

    शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त100 रुपयांत आनंदाचा शिधा

    प्रतिनिधी

    मुंबई : गुढीपाडवा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना केवळ 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.Important decision of Shinde-Fadnavis government Anandacha Shidha For Ration Card Holder On the occasion of Gudipadwa, Dr Babasaheb Ambedkar Jayanti



    याचा लाभ 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढीपाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.

    हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा एकूण 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चासदेखील मान्यता देण्यात आली.

    Important decision of Shinde-Fadnavis government Anandacha Shidha For Ration Card Holder On the occasion of Gudipadwa, Dr Babasaheb Ambedkar Jayanti

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!