विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिक्षणामुळे सुसंस्कृता येते असे म्हणतात. मात्र, २४ लाख पगार मिळविणाऱ्या आणि आयआयटी या भारतातील सर्वात प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेचा पदवीधर असलेल्या विकृताने हा समज खोटा ठरविला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या मुलीबाबत त्याने आक्षेपार्ह ट्विट केले.IIT graduate making offensive remarks about Virat’s daughter held
ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर खेळाडूंना आणि विशेषत: कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. एका विकृताने तर विराट कोहलीच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकीच दिली.
संपूर्ण देशभरात याबाबत कठोर शब्दांत निंदा व्यक्त करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याबाबत पुढाकार घेत सायबर सेलच्या माध्यमातून धमकी देणाºयाचा शोध घेतला. त्याला अटकही करण्यात आली आहे. हा विकृत उच्चशिक्षीत असून आयआयटीचा पदवीधर आहे.
आरोपीचं नाव रामनागेश श्रीनिवास अगुबथिनी असून तो २३ वर्षांचा आहे. रामनागेश याने दोन वर्षांपूर्वीच आयआयटी हैदराबादमधून पदवीपयंर्तंच शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर एका नामांकित फूट अॅप कंपनीत तो नोकरी करत होता. या कंपनीत त्याला तब्बल २४ लाख रुपया वार्षिक पॅकेज होते.
नुकतीच त्याने स्वत:हून नोकरी सोडली होती आणि अमेरिकेत जाऊन मास्टर डिग्री करण्याची तयारी सुरू केली होती. रामनागेशचे वडिलांना अजूनही कळालेलं नाही की त्यांच्या मुलाला का अटक करण्यात आली आहे. ते देखील मुलासह हैदराबादहून मुंबईत दाखल झाले आहेत.
विराट कोहलीच्या मुलीला दिल्या गेलेल्या धमकीनंतर दिल्लीच्या महिला आयोगानं यावर कारवाई केली. दिल्ली महिला आयोगानं याप्रकरणी पोलिसांना नोटीस धाडली आणि संबंधित प्रकरणात टिप्पणी करणाऱ्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. विराट कोहलीच्या मॅनेजरनही पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवली.
त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर बुधवारी ज्या अकाऊंटवरुन धमकी देण्यात आली होती त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. हैदराबादहून त्याला ताब्यात घेण्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले.
IIT graduate making offensive remarks about Virat’s daughter held
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल