• Download App
    “राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?” अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल! If you wanted to withdraw your resignation why did you give it Ajit Pawar direct question to Sharad Pawar

    “राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?” अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल!

    ‘’… तर पवारांची औलाद सांगणार नाही’’ असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा  म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचा मेळावा पार पडला. अजित पवारांनी मेळाव्यात बोलताना, उघडपणे मनातली खदखद बोलून दाखवली. शिवाय, शरद पवारांवरही टिप्पणी केली. If you wanted to withdraw your resignation why did you give it Ajit Pawar direct question to Sharad Pawar

    अजित पवारांनी संपूर्ण राजकीय इतिहास सांगताना, शरद पवारांनी कशाप्रकारे वेळोवेळी भूमिका बदलून पक्षाचं नुकसान केलं, मला वाईट ठरवले हे सांगितलं. एवढच नाहीतर मध्यंतरी शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्याचाही उल्लेख करत, “राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला?” असा थेट सवाल उपस्थित केला.

    एवढच नाहीतर तर शरद पवारांचं आता वय झालं आहे, त्यांनी थांबायला हवं. तरूण नेतृत्वाला पुढे येऊ द्यायला पाहिजे, असं बोलून दाखवलं. याशिवाय, २०१९ मध्ये भाजपासोबत पाच बैठका झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.  तसेच,  मी खोटे बोलत नाही आणि खोटे बोलले तर पवारांची औलाद सांगणार नाही,असे अजित पवार म्हणाले.

    If you wanted to withdraw your resignation why did you give it Ajit Pawar direct question to Sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!