तुम्ही फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का?’असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. If you want to point the finger at the center every time, let the state central government run it – Chandrakant Patil
विशेष प्रतिनिधी
पुणे : “केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा निधी मिळाला नाही” असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलं होतं. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की ,”आतापर्यंत राज्याला केंद्र सरकारने काही दिलं तरी राज्य सरकार प्रत्येकवेळी केंद्र सरकारवर बोट दाखवत आहे.केंद्र सरकारने दरवेळी राज्याला मदत दिली आहे. प्रत्येक वेळी केंद्रावरच बोट दाखवायचं असेल तर राज्य केंद्र सरकारला चालवायला द्या” अशी टीका केली आहे.
पुढे चंद्रकांत पाटील यांनी ,’तुम्ही फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का?’असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.तसेच “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ( २६ जानेवारी ) खूप दिवसांनी बाहेर पडले.तसेच आम्ही त्यांच्या तब्येतीसाठी वेळोवेळी प्रार्थना करत होतो. विशेष म्हणजे आमची इच्छा इतकीच होती की, मुख्यमंत्र्यांना प्रवास सहन होत नाही तर त्यांनी त्यांचा चार्ज दुसऱ्यांना द्यावा. कारण राज्य कारभार चालला पाहिजे”.
If you want to point the finger at the center every time, let the state central government run it – Chandrakant Patil
महत्त्वाच्या बातम्या
- जाट समाजाला जोडण्यासाठी अमित शहा यांनी घेतली सामाजिक बंधुता बैठक, २५० हून अधिक जाट नेत्यांची उपस्थिती
- अमेरिकेचा पुन्हा एकदा भारतविरोधी प्रचार, भारतात बलात्काराच्या घटना वाढल्याने प्रवास टाळण्याचे नागरिकांना निर्देश
- मास्क घालून जेवणारा पहिला माणूस, सोशल मीडियावर राहूल गांधी यांची उडविली जातेय खिल्ली
- ओमायक्रॉन मानवी त्वचेवर 21 तासांपर्यंत जगू शकतो