विशेष प्रतिनिधी
बीड : मराठा आरक्षणा संदर्भात ओबीसींमध्ये आरक्षण द्या हा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारा. मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनी हा प्रश्न विचारा. ते कोणीही उत्तर देणार नाहीत. मला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.If you want to ask questions about reservation, make me the Chief Minister, statement of Sambhaji Raje Chhatrapati in Beed
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांनी आरक्षण जनसंवाद दौरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला आहे. बीडमध्ये खासदार संभाजीराजे यांचा हा जनसंवाद झाला. संभाजीराजे दोन दिवसीय बीड दौऱ्यावर आहेत.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. सर्व बहुजन समाजातील लोकांना न्याय देणार. माझा शब्द आहे बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका असणार आहे. पण आरक्षणाबाबत मला प्रश्न विचारणार असाल तर मला मुख्यमंत्री करा.
संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण द्या अशी मागणी तुम्ही का करत नाही? मी ही मागणी करू शकत नाही आणि असा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री तसेच मागच्या उपमुख्यमंत्री, मंत्र्यांना विचारा तेवढे जमले नाही तर संभाजी राजांना मुख्यमंत्री करा बहुजनांचे सर्व प्रश्न सोडतो.
राज्य सरकारकडे सारथी संदर्भात आणि इतर काही मराठा समाजाच्या मागण्या दिल्या आहेत. त्या पूर्ण करू असा शब्द राज्य सरकारला दिला आहे. मात्र त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर छत्रपतींची भूमिका बदलेल. हात वर येतील, बोट समोर येतील ,कॉलरवर येईल, बटणे उघडतील एवढेच नाही तर कपडे देखील डार्क होतील.
If you want to ask questions about reservation, make me the Chief Minister, statement of Sambhaji Raje Chhatrapati in Beed
महत्त्वाच्या बातम्या
- ममतांना हायकोर्टाचा दणका : हिंसाचारातील पीडितांना उपचार, रेशन देण्याचे आदेश, सर्व गुन्ह्यांच्या नोंदी आवश्यक!
- ‘राहुल गांधींचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?’, लसीवरील ट्वीटवरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फटकारले
- बॉलीवूडकडे ईडीचा मोर्चा, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला समन्स, नुकतेच झाले होते लग्न
- ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार
- योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!