• Download App
    मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा |If we don't take to the streets and fight for Maratha reservation now, time will pass, warns Chandrakant Patil

    मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा

    कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र, त्याला झुगारून देण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.If we don’t take to the streets and fight for Maratha reservation now, time will pass, warns Chandrakant Patil


    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारकडून मुस्कटदाबी सुरू आहे. मात्र, त्याला झुगारून देण्याची गरज आहे. मराठा आरक्षणासाठी आत्ता रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.

    कोल्हापूर येथे बोलताना ते म्हणाले, कोरोनाचे संकट आहे म्हणून आयुष्य संपलेले नाही. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासाठी याचिका दाखल करण्यासाठी राज्य सरकारला ४ जूनपर्यंत मुदत आहे. कोरोनामुळे ह मुदत वाढणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे त्यानंतर फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही.



    पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला स्थगिती येण्यापूर्वी ज्या उमेदवारांची शासकीय नोकरीसाठीची प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना ते द्यायला हवे. त्यांचे केवळ नेमणूकपत्रच देणे बाकी आहे.

    मराठा आरक्षणावर भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगताना पाटील म्हणाले, भाजपा राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही. परंतु, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी होऊ. त्यासाठी पीशचा बिल्ला आणि बॅनर बाजुला ठेऊन सहभागी होऊ.

    खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशिल आहे. त्यांनी नेतृत्व करावे. आम्ही पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी आम्ही पाठिंबा देऊ.

    खासदार संभाजीराजे यांच्याविषयी बोलताना पाटील म्हणाले, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. पण मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा नसून राज्य सरकारचा आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा भाजपाने कायम सन्मान केला आहे.

    त्यांना भाजपा कार्यालयात येऊन फॉर्म भरावा लागू नये यासाठी राष्टÑपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घषतला. अलाहाबाद येथील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तत्कालिन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचा सत्कार केला.

    त्यावेळी पंतप्रधानांसह सर्व नेत्यांनी त्यांचे उभे राहून अभिनंदन केले. राज्य सरकारने संभाजीराजे यांच्याच अध्यक्षतेखाली रायगड विकास समितीची स्थापना केली आहे. त्यांच्या आरक्षणासाठीच्या लढ्यालाही भाजपा पूर्ण पाठिंबा देईल.

    If we don’t take to the streets and fight for Maratha reservation now, time will pass, warns Chandrakant Patil

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस