• Download App
    ... त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो, तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? – प्रफुल्ल पटेल! If we can embrace that Shiv Sena why can not we go with BJP Praful Patel

    … त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो, तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? – प्रफुल्ल पटेल

    अजित पवारांना बदनाम करण्यासाठी कट रचला जात असल्याचा आरोपही केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :  ‘’महाविकास आघाडी बनली तेव्हा शिवसेना भाजपासोबत होती. आजपर्यंत सर्वात जास्त शिव्या शरद पवार यांना शिवसेना आणि बाळसाहेब ठाकरे यांनी दिल्या. त्या शिवसेनेला आपण मिठी मारू शकतो तर भाजपसोबत का जाऊ शकत नाही? आम्ही स्वाभिमानाने युतीत आलो आहोत. मेहबूबा मुफ्ती, फारख अब्दुल्ला भाजपासोबत जाऊ शकतात, तर आम्ही का नाही?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. If we can embrace that Shiv Sena why can not we go with BJP Praful Patel

    महाराष्ट्रात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा  म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचा मेळावा पार पडला. याप्रसंगी प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका मांडली.

    प्रफुल्ल पटेल म्हणाले,  ‘’ शरद पवार साहेबांची सावली असणारा मी या मंचावर, अजित पवार यांच्याबरोबर उभा आहे. यात जो इशारा आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. अजित पवारांमागे माझी ताकद आहे. मी हा निर्णय का घेतला? हे योग्यवेळी सांगेन. अजित पवारांना बदनाम करण्यासाठी कट रचला जात आहे.’’

    याशिवाय, ‘’मी एक सौम्य व्यक्ती आहे, त्यामुळे मी खूप कमी बोलतो. कमीच बोललेलं बरं. कारण मलाही एक दिवस माझं पुस्तक लिहायचं आहे, पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. हे पुस्तक जेव्हा प्रफुल्ल पटेल लिहिणार त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला काय काय समजेल हे मला सांगायची अजिबात इच्छा नाही, किमान आज तरी तशी इच्छा नाही. मी या मंचावर का आणि त्या मंचावर का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर शोधतोय. पंरतु याचं उत्तर मी तुम्हाला आज देणार नाही. त्याची योग्य वेळ येऊ द्या. तुम्हाला आवश्यक असलेला खुलासा मी करणार आहे.’’ असंही पटेलांना यावेळी सांगितलं.

    याशिवाय, ‘’महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदारांनी भाजपeसोबत सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही शरद पवार यांना विनंती केली होती. त्यामुळे नवीन अचानक पिल्लू सोडलं आहे असं अजिबात गैरसमज करू नये. अजित पवारांनी विश्वासघात केला असता, तर त्यांना पदे देण्यात का आली? त्यांच्यावर आमदारांनी विश्वास दाखवला आहे ते सन्मानाला पात्र आहेत.’’ अशा शब्दांमध्ये प्रफुल्ल पटेलांनी अजित पवारांचे समर्थन केले.

    If we can embrace that Shiv Sena why can not we go with BJP Praful Patel

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस