• Download App
    थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अतुल भातखळकर यांची मागणी|. If there is any shame left, then Health Minister Rajesh Tope should resign or the Chief Minister should take it, demands Atul Bhatkhalkar

    थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अतुल भातखळकर यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा. नसेल तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा,  अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.. If there is any shame left, then Health Minister Rajesh Tope should resign or the Chief Minister should take it, demands Atul Bhatkhalkar

    भातखळकर यांनी म्हटले आहे की, एक दिवशी दोन परीक्षा, दोन सेंटर, दोन्ही काही मैलावर. ‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’- आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेत दुसऱ्यांदा गोंधळ झालाय.



    आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षांतील गोंधळ संपत नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता राज्याती राजकारण पुन्हा एकदा तापाताना दिसत आहे. विरोधी पक्ष भाजपाकडून ठाकरे सरकार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात आहे. २४ ऑक्टोबरला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी पसंती दिलेल्या केंद्राऐवजी दूरचे केंद्र, सकाळच्या सत्रातील परीक्षेसाठी एका जिल्ह्य़ातील आणि दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी दुसऱ्याच जिल्ह्य़ातील केंद्र,

    परीक्षा शुल्क न भरलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र असे प्रकार समोर आले असून, परीक्षा पुढे ढकलूनही परीक्षा नियोजनातील गोंधळाबाबत उमेदवारांकडून तीव्र संताप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    भातखळकर म्हणाले , सप्टेंबर महिन्यातील आरोग्य भरतीच्या वेळी नोकरभरतीमध्ये जो गोंधळ राजेश टोपे यांनी घातला. तोच गोंधळ आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेबाबत आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे ही १००-१०० किलोमीटर अंतरावर आहेत. टोपे साहेब आता या सगळ्या विद्यार्थ्यांना हेलिकॉप्टरची सोय करून द्या. कारण, पुण्यातील मनुष्य वाशीमला कसा जाणार? आणि वाशीमची परीक्षा दिलेला परत पुण्याला कसा जाणार?

    सगळा भ्रष्टाचार, सगळा गोंधळ. आम्ही त्याच वेळी मागणी केली होती की या आयटी कंपनीचा परवाना तत्काळ रद्द करा. याचं आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं काय साटंलोटं आहे, त्याचा तपास करा. पण नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्री ढिम्मं आपल्या घरात बसून आहेत. गेल्यावेळची नुकसानभरपाई तर विद्यार्थ्यांना मिळाली नाहीच. आता यावेळीची देखील परीक्षा पुढे ढकलण्याची नामुषकी या सरकारवर येणार आहे आणि त्यामुळे आता तरी राजेश टोपेंना आरोग्यमंत्री पदावरून तत्काळ हाकललं पाहिजे. या परीक्षा सुनियोजित पद्धतीने घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे.

     If there is any shame left, then Health Minister Rajesh Tope should resign or the Chief Minister should take it, demands Atul Bhatkhalkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा