• Download App
    महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी; देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान । If the Mahavikas Aghadi government has the guts, then Raza Academy should be banned; Devendra Fadnavis's challenge

    महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी; देवेंद्र फडणवीस यांचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : त्रिपुरात न घडलेल्या घटनांचे निमित्त करून रझा अकादमीने काढलेल्या मोर्चांकडे दुर्लक्ष करुन फक्त दुसऱ्या दिवशीच्या मोर्चेकऱ्यांवरच महाविकास सरकार कारवाई करत आहे. त्यांचा हा राजकीय व्यवहार दुटप्पी आहे. महाविकास आघाडी सरकारची हिंमत असेल तर त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालून दाखवावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.



    देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे

    • अमरावती येथील घटनाक्रम दुर्दैवी.
      अमरावती येथील मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे.
    • आदल्या दिवशी झालेला घटनाक्रम दुर्लक्षित करायचा आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनांवर केवळ लक्ष केंद्रीत करायचे हे योग्य नाही.
    • भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. टार्गेट करून, याद्या तयार करून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे.
    • एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाई! ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे.
    • जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील.
    • त्रिपुरात जी घटना घडलीच नाही, त्यावर १२ तारखेचै मोर्चे निघाला. हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे.
    • त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत, त्यावर वातावरण तापवले गेले. तेथील पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला.
      तरी सुद्धा ८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी त्यावर ट्विट केले.
    • जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला विरोध करू शकत नाही, तेव्हा संपूर्ण देशात लांगूलचालन करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न.
    • असेल हिंमत तर घाला रझा अकादमीवर बंदी.

    If the Mahavikas Aghadi government has the guts, then Raza Academy should be banned; Devendra Fadnavis’s challenge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस