• Download App
    Sharad Pawar शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार झाले, तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण दूरच; पवार कुटुंबाचा फायदा पण अनुयायी तोट्यात!!

    शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार झाले, तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण दूरच; पवार कुटुंबाचा फायदा पण अनुयायी तोट्यात!!

    नाशिक : राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार जर महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार झाले तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण आणखी दूर जाईल. यातल्या राजकारणात पवार कुटुंबाचा फायदा जरूर होईल, पण त्यांचे अनुयायी मात्र तोट्यात जातील.

    राज्यसभा निवडणूक आणि त्यानंतरची विधान परिषद निवडणूक यांचे राजकारण बारकाईने पाहिले, तर त्यातली गुंतागुंत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाशी सुद्धा जोडलेली आहे. म्हणूनच शरद पवार जर महाविकास आघाडीचे उमेदवार झाले, तर ते महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतांच्या बळावर निवडून सुद्धा येतील त्यांना भाजपच्या मतांची गरज सुद्धा लागणार नाही पण तसे झालेच, तर भाजप दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण लवकरात लवकर होऊ देणार नाही. कारण त्यात भाजपला कुठलाच राजकीय फायदा होणार नाही आणि आपला राजकीय फायदा होणार नसेल, तर भाजप दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची शक्यता आपले राजकीय हत्यार वापरून दूरच करेल. त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करण्याची शक्यता शिल्लक ठेवली जाणार नाही.

    आजोबा आणि नातू राज्यसभेत

    अर्थात राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पार्थ पवारची उमेदवारी जाहीर झाली, तर पार्थ पवार आणि शरद पवार असे नातू आणि आजोबा राज्यसभेत जरूर पोहोचतील, पण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी दूर सारल्याने शरद पवारांचे राजकीय अनुयायी मात्र विलीनीकरणाच्या लाभापासून वंचित राहतील. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे आणि अगदी रोहित पवार सुद्धा राज्यातल्या मंत्रिपदापासून वंचित राहतील.

    – सुनेत्रा पवार विधानसभेत, पण पवारांचे अनुयायी तोट्यात

    राज्यसभा निवडणुकीच्या आणि विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणाचा फायदा पवार कुटुंबीयांना होईल. त्याचबरोबर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक सुद्धा सुनेत्रा पवार याच जिंकतील. कारण मूळातच ती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होईल आणि अगदीच निवडणूक बिनविरोध झाली नाही, तरीसुद्धा मतदानाच्या बळाच्या आधारे सुनेत्रा पवार विधानसभेत पोहोचतील. म्हणजेच एका वेळी आजोबा आणि नातू आणि त्याचबरोबर सून हे पवार घराण्यातलेच सदस्य कायदेमंडळाचे सदस्य बनतील, पण शरद पवारांच्या अनुयायांना मात्र यातून कुठला लाभ होण्याची शक्यता नाही. याला कारणीभूत शरद पवारांची महाविकास आघाडी कडून राज्यसभेची उमेदवार ठरेल. शरद पवारांनी एकदा महाविकास आघाडीतून उमेदवारी केली, की भाजप त्यांना उघडपणे जवळ करणार नाही. पवार आणि भाजप सध्या मारताहेत, तसेच एकमेकांना डोळे मारत राहतील. काँग्रेसला आणि शिवसेनेला खिजवत राहतील, पण या सगळ्यांमध्ये पवारांचे अनुयायी मात्र तोट्यात जातील.

    If Sharad Pawar becomes MVA candidate, then NCP merger impossible

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तर शरद पवार दाखल करणार अर्ज??; पराभवाच्या भीतीने घेणार निर्णय??

    AI मुळे जागतिक बाजारपेठेत मोठे बदल; कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि भविष्यसज्ज महाराष्ट्र घडवायचा संकल्प

    पंतप्रधान पदाच्या शर्यतीतल्या नेत्याच्या राज्यसभा खासदारकीसाठी दिल्ली आणि मुंबईत लॉबिंग करावे लागतेय, हीच खरी बातमी!!