• Download App
    ओबीसी आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही; सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात नेत्यांचा निर्धार If no OBC reservation then no to elections in maharashtra

    ओबीसी आरक्षण परत मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाही; सर्वपक्षीय ओबीसी मेळाव्यात नेत्यांचा निर्धार

    प्रतिनिधी

    लोणावळा – ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळाल्याशिवाय महाराष्ट्रात झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी ओबीसी मेळाव्यात केला आहे. If no OBC reservation then no to elections in maharashtra

    भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशे खर बाबनकुळे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते नाना पटोले आदी मेळाव्याला उपस्थित होते. आतापर्यंत अनेकवेळा निवडणुका पुढे ढकलल्या तशा ह्या देखील ढकलाव्यात, अशी मागणी मेळाव्यात करण्यात आली. ओबीसींच्या हक्कासाठी राजधानीत चक्काजाम करू, न्यायालयात जाऊ…”चक्का जाम तो झाकी है, असली आंदोलन अभी बाकी है” असे काल पंकजा मुंडे यांनी ट्विट केले होते. त्याला सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला.

    मराठा – ओबीसींमध्ये वाद निर्माण करून राजकारण करू नका. हे महापाप आहे. भिंती उभी करू नका. सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण हे शाहू महाराज, आंबेडकरांनी दिले आहे. हा सामाजिक परिवर्तनाचा लढा, नेतृत्व माझे नाही तुमचे आहे, ही लढाई आपल्याला सर्वांनी मिळून जिंकायची आहे. आम्ही न्याय दिला होता पण सरकार बदलले. या सरकारने वेळ घालवला. डाटा तयार केला नाही. इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारचे त्यांनी ते करावे.” असे देखील पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    ओबीसी परिषदेत मांडलेले राजकीय ठराव

    • 2011 मध्ये केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा केला आहे, तो राज्य सरकारला द्यावा.
    • हे आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशा स्वरूपाचा ठराव पारित करत आहोत – बाळासाहेब सानप
    • रिव्ह्यू पिटीशन दाखल करून इम्पेरियल डेटा केंद्र सरकारने द्यावा – बापूसाहेब भुजबळ
    • ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र यावा यासाठी ठराव मांडत आहे. – बबनराव तायवाडे
    • मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध नाही. मात्र, ओबीसीमधून मराठा आरक्षण देऊ नये – रामराव वडकुटे.

    If no OBC reservation then no to elections in maharashtra

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस