विशेष प्रतिनिधी
हिस्सार : काँग्रेसमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीचे 50 % तिकिटे मुसलमानांना द्यावीत, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातल्या हिस्सार मधून काँग्रेसला दिले. हरियाणातील वेगवेगळे विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी waqf सुधारणा कायद्याचे जोरदार समर्थन करत काँग्रेसचे वाभाडे काढले. If it has the courage, Congress should have a Muslim party president.
पंतप्रधान मोदी म्हणाले :
– काँग्रेसने संविधानाचा वापर आपल्या सत्तेच्या हत्यारासारखा केला. जेव्हा काँग्रेसची सत्ता धोक्यात आली तेव्हा काँग्रेसने संविधान गुंडाळून ठेवले. आज संविधान खिशात घेऊन फिरणारे संविधानाला फक्त सत्तेसाठी वापरत होते.
– बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की देशामध्ये कधीही धार्मिक आधारावर आरक्षण देता येणार नाही पण काँग्रेसने संविधान फाडून टाकून आपली राजवट असलेल्या राज्यांमध्ये धार्मिक आधारावर मुसलमानांना आरक्षण दिले.
– काँग्रेसने तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी केवळ कट्टरपंथी मुस्लिमांना फायदा पोहोचवला. पसमांदा मुस्लिम, मुस्लिम महिला, मुस्लिम विधवा यांच्याकडे कायम दुर्लक्ष केले. 2013 मध्ये तुष्टीकरणाच्या राजकारणातूनच त्यांनी waqf कायदा करून त्याला संविधानाच्या वरती नेऊन ठेवले होते. आम्ही तो कायदा बदलून संविधानाचा सन्मान राखला.
– काँग्रेसने देशातल्या दीन दलित, आदिवासी यांचा हक्क हिरावून तो कट्टरपंथी आणि धर्मांध मुस्लिमांना दिला. पण काँग्रेसने स्वतःच्या पक्षात कधी मुस्लिमांचा सन्मान केला नाही. काँग्रेसकडे तर हिंमत असेल, तर त्यांनी मुस्लिम पक्षाध्यक्ष करून दाखवावा आणि निवडणुकीची 50 % तिकिटे मुस्लिमांना देऊन दाखवावीत. पण काँग्रेसला स्वतःच्या पक्षात मुस्लिमांना स्थान द्यायचे नाही, तर देशातल्या इतर सामान्य नागरिकांचा हक्क हिरावून घेऊन तो कट्टरपंथी मुस्लिमांना द्यायचा आहे. काँग्रेसचा हा देश विघातक विचार आहे.
If it has the courage, Congress should have a Muslim party president.
महत्वाच्या बातम्या
- पवार काका – पुतणे एकत्र येण्यात गैर काय? प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चा
- Ukraine : दावा- युक्रेनमधील भारतीय गोदामावर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला; युक्रेनने म्हटले- रशियाने मुद्दाम केले
- Trump : ट्रम्प यांनी स्मार्टफोन, संगणकांना परस्पर शुल्कातून सूट दिली; लॅपटॉप, सेमीकंडक्टर, सोलर सेल्सना सूट नाही
- Sukhbir Badal : सुखबीर बादल पुन्हा अकाली दल प्रमुख बनले; 5 महिन्यांनी वापसी; तनखैया घोषित केले होते