तसेच घटनास्थळी प्रसंगावधान राखत जीवितहानी टळली. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.आगीत सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे.Ichalkaranji textile oil factory fire caused by short circuit, loss of Rs 20 lakh
विशेष प्रतिनिधी
तारदाळ : इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीच्या कारखान्याला शॉर्टसर्किटने आग लागली.या आगीचामोठा भडका उडाला.आज पहाटेच्या सुमारास लागलेली आग तीन तासांनी आटोक्यात आणली.या आगीत कल्लाप्पाण्णा आवाडे इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या औद्योगिक वसाहतीमधील विजेता प्रॉडक्ट या ऑइल कंपनीचे सुमारे वीस लाखाचे नुकसान झाले आहे.दरम्यान तब्बल 25 हुन अधिक अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले .दरम्यान सुदैवाने जीवितहानी टळली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,इचलकरंजीमध्ये कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्स्टाईल पार्क नावाची औद्योगिक वसाहत आहे.दरम्यान या वसाहतीत गेल्या सहा महिन्यांपासून विजेता प्रोडक्ट हा वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या ऑइल निर्मितीचा कारखाना सुरु होता.दरम्यान आज सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक या कारखान्यात आग लागली आणि ऑइलसारख्या जळाऊ पदार्थ कारखान्यात असल्याने आगीचा मोठा भडका उडाला.
यावेळी आगीचे लोट दूरवरून दिसत होते.तसेच घटनास्थळी प्रसंगावधान राखत जीवितहानी टळली. पण मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.आगीत सुमारे 20 लाखाचे नुकसान झाले आहे.दरम्यान आसपासच्या नगरपालिका हद्दीतील तसेच सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल 25 अग्निशामक बंबाच्या सहाय्याने अडीच तासानंतर आग विझवण्यात यश आले.
Ichalkaranji textile oil factory fire caused by short circuit, loss of Rs 20 lakh
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर रणजितसिंह डिसले गुरुजींना 5 महिन्यांची रजा मंजूर, 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत मिळणार रजा
- हवामानातील बदलामुळे मुंबईकर हैराण, धुळीने श्वास कोंडला; नीचांकी कमाल तापमानाची नोंद
- गोव्यात लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्षच लढणार; अनेक पक्ष संपर्कात असल्याचाही दावा
- पुणे-नगर मार्गावर भीषण अपघातात पाच ठार; भरधाव ट्रकची कारसह दोन दुचाकींना धडक