विशेष प्रतिनिधी
सातारा : माजगांव, ता .पाटण येथे पती पत्नीच्या घरगुती दिवसभराच्या भांडणाच्या रागातून पतीने स्वत:चे घर पेटवल्याने शेजारील नऊ कुटुंबाच्या घरास भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.Husband-wife quarrel, but neighbors’ houses set on fire; Angery Husband set the house on fire himself; Incidents in Satara district
आगीचे रौद्र रूप एवढे भयंकर होते. त्यामध्ये सर्व दहा कुटुंबांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्य, दागदागिने, रोखड , शेतीची औजारे आदी आगीमध्ये जाळून खाक झाले.
येथील संजय रामचंद्र पाटील व पालवी संजय पाटील यांचे कौटुंबिक घरगुती भांडण आज दिवसभर सुरू होते. भांडणाच्या रागाने वैतागुन संजय पाटील याने स्वत:च्या राहत्या घरात आग लावली, त्यामध्ये घरातील दोन गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
त्यामुळे शेजारील पांडुरंग महादेव पाटील, ज्ञानदेव महादेव पाटील, संभाजी गणपत पाटील, चंद्रकांत शिवाजी पाटील, भिमराव गणपती पाटील, दातत्रय मारुती पाटील, कृष्णात मारुती पाटील, पंढरीनाथ मारुती पाटील, गोरखनाथ मारुती पाटील व भाडेकरू आनंदराव तुकाराम पाटील या दहा घरांना भीषण आग लागून बाधित सर्वांचे घरासह पन्नास लाखांच्या वर नुकसान झाले आहे.
सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पाटण तालुका खरेदी विक्री संघ, साह्याद्री साखर कारखान्याच्या व जयवंत शुगर च्या अग्निशामक या तीन गाडयांना प्रचारण केले. ग्रामस्थांच्या दोन तासांच्या मदतीने आग आटोक्यात आणली तोपर्यंत सर्व घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, टी व्ही, फ्रिज, दागिने, रोखड व इतर मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
माजगाव ग्रामपंचायतीने नळास मुबलक पाणी सोडून गावातील तरुणांनी प्रथम आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला.शेजारील लोकांनीही घरातील मिळेल त्या पाण्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी माहिती मिळताच माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे स.पो. नि.उत्तम भापकर, चाफळ पोलीस दूर क्षेत्राचे सिद्धांत शेडगे, होमगार्ड यांनी घटनास्थळी थाव येऊन मदतकार्य केले.
Husband-wife quarrel, but neighbors’ houses set on fire; Angery Husband set the house on fire himself; Incidents in Satara district
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे – ओबीसी , मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात असंतोष आहे
- क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानच्या भवितव्याचा निर्णय आज होणार; १७ दिवसापासून अटकेत
- प. बंगालमधील नामवंतांचे शेख हसीना यांना पत्र , मंदिरांवरील हल्लेखोरांना शासन करा
- उत्तराखंडमध्ये पावसाचे रौद्ररूप, महापुराचा हाहाकार; अनेक गावांचा संपर्क तुटला ; ४७ जणांचे बळी
- कॅप्टन अमरिंदर सिंग करणार नवीन पक्ष स्थापन, कॉंग्रेस विरोधात भाजपसह इतर पक्षांची आघाडी