• Download App
    HSRP Number Plate Deadline Extended Nov 30 राज्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा; HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख

    HSRP : राज्यातील वाहनधारकांना मोठा दिलासा; HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर

    HSRP

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : HSRP राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी यापूर्वी 15 ऑगस्ट 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र वाहन मालकांचा अल्प प्रतिसाद लक्षात घेता ही अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.HSRP

    राज्यातील वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसवणे आवश्यक असून, यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केलेल्या आवाहनानुसार, वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीत एचएसआरपी बसवून नियमांचे पालन करावे.HSRP



    1 डिसेंबर 2025 पासून अशा वाहनांवर, ज्यांनी एचएसआरपी बसवलेली नसेल किंवा अपॉइंटमेंट घेतलेली नसेल, त्यांच्यावर वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई होणार नाही. त्यामुळे सर्व संबंधित वाहन मालकांनी ही महत्त्वाची माहिती लक्षात ठेवून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी.

    राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत यापूर्वी 15 ऑगस्टपर्यंत वाढवली होती, मात्र अपेक्षेप्रमाणे वाहनधारकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता मुदत संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, वाहनधारकांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

    1 डिसेंबरपासून होणार कारवाई

    महाराष्ट्र शासनाने HSRP (उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक) प्लेट बसवण्यासाठी आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुमारे साडे तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घेऊन HSRP नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई होणार नाही, मात्र जे वाहनधारक नंबर प्लेट बसवणार नाहीत किंवा अपॉइंटमेंट घेणार नाहीत, त्यांच्यावर 1 डिसेंबर 2025 पासून नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

    HSRP Number Plate Deadline Extended Nov 30

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pune Police : पुण्याचे पोलीस केवळ दंड वसूल करण्यासाठी आहेत का ?

    मुंबईत बीडीडी चाळवासीयांची स्वप्नपूर्ती; 556 घरांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण

    Dhananjay Munde : धनंजय मुंडे अखेर ‘सातपुडा’ बंगला सोडणार? पण दंडाचं काय?