• Download App
    विद्यार्थ्यांनो प्रतिक्षा संपली; 'या' तारखेला लागणार बारावीचा निकाल HSC 2023 Result : Students waiting is over

    HSC 2023 Result : विद्यार्थ्यांनो प्रतिक्षा संपली; ‘या’ तारखेला लागणार बारावीचा निकाल

    प्रतिनिधी

    मुंबई : दहावी बारावीच्या निकालाची संपूर्ण राज्याला उत्सुकता लागून राहिलेली असते. घरात बोर्डाचा विद्यार्थी असो वा नसो सगळ्यांचा निकालाकडे डोळा असतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यात झालेल्या नानाविध राजकीय-सामाजिक घडामोडींमुळे या वर्षीचा निकाल उशीरा लागणार की काय अशी चिंता सगळ्यांना होती. पण आता ही चिंता मिटली आहे. HSC 2023 Result : Students waiting is over

    इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३ ते २१ मार्च २०२३ दरम्यान झाली. लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या बहुप्रतिक्षीत परीक्षेचा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.

    संकेतस्थळ क्रॅश होण्याआधी

    एकाच वेळी लाखो विद्यार्थी शासनाच्या संकेतस्थळावर निकाल पाहातात. त्यामुळे संकेतस्थळावरचा भार वाढतो. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे संकेतस्थळ क्रॅश होणे. दहावी-बारावीच्या निकालाच्या दिवशी साईट क्रॅश होणे हे पालक-विद्यार्थ्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे निकाल पाहाण्यासाठी लवकरता लवकर पुढील संकेतस्थळांवर जावे.

    www.mahresult.nic.in
    https://hscresult.mkcl.org/
    https://hsc.mahresults.org.in
    www.mahresult.nic.in

    काही मिनिटांसाठी संकेतस्थळावर काहीच दिसले नाही तर घाबरून जाऊ नये. पुन्हा काही मिनिटांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.

    HSC 2023 Result : Students waiting is over

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस