• Download App
    किती लाचार व्हाल? बाळासाहेब असते तर एक थोबाडीत मारली असती, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना सुनावले|How helpless would you be? If it was Balasaheb he would slapped you, Chandrakant Patil told Sanjay Raut

    किती लाचार व्हाल? बाळासाहेब असते तर एक थोबाडीत मारली असती, चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : त्रिपुरात मशीद पाडल्याच्या कथित वृत्तानंतर त्याचे पडसाद मालेगावमध्ये उमटणे यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याची मला खूप कीव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल, असा जाब विचारत आज स्व. बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर एक थोबाडीत मारली असती, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना सुनावले.How helpless would you be? If it was Balasaheb he would slapped you, Chandrakant Patil told Sanjay Raut

    रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावर पाटील म्हणाले, सगळ्या गोष्टी आमच्याच आहेत का? काय सुरु आहे ही चेष्टा? प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात असतो का? एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या झाल्या तरी भाजपचाच हात?



    तीन पक्ष एकत्र असून तुम्ही दुबळे आहात. सरकार अपयशी आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, आजी गृहमंत्री आता आजारातून उठलेत तर मुख्यमंत्री दवाखान्यात आहेत. सध्या राज्य बाहेरुन चालवले जाते आहेत.

    राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, 95 टक्के मुसलमान हा देशप्रेमी आहे. मात्र, 5 टक्के मुसलमान धार्मिक चिथावणीला बळी पडून हे करतो. त्याच्यावर तुम्ही टीकाही करणार नाही? प्रत्येक विषयात झोपताना उठताना तुम्हाला भाजपाच दिसतोय, असा संतापही पाटील यांनी व्यक्त केला.

    देशाला स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, असे वादग्रस्त विधान कंगनाने केले होते. यावर पाटील म्हणाले, ते विधान चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही. पण मोदी सरकारसंबंधीचे विधान काही अंशी बरोबरही आहे.

    How helpless would you be? If it was Balasaheb he would slapped you, Chandrakant Patil told Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा