नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी दोन ठाकरे बंधू, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी उद्या संयुक्त मोर्चाचे आयोजन केले असले आणि तिथे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या विरोधात बिगुल फुंकणार असले, तरी या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाल्याशिवाय राहणार नाहीत. Maharashtra
कोणत्या स्थितीत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीच्या आत मध्ये पूर्ण करा, असे आदेशच सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेत. त्यांचे दोन्ही संस्थांना पालन करावेच लागेल, म्हणूनच निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी वेगात आणून विरोधी पक्षांच्या मागणीची दखल घेत मतदार यादी शुद्धीकरणासाठी पाऊल उचलले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती आणि पंचायत समितीच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जातील आणि त्या पारही पाडल्या जातील. त्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाची निवडणुकीची तयारी आहे आणि तयारी नाही हे पाहण्याची गरज निवडणूक आयोगाला नाही. थोडक्यात महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन किंवा वायले राहून निवडणुकीला विरोध केला तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.
– ग्रामीण भागात भाजपला प्रतिकूल परिस्थिती
निवडणुकीला विरोध करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आणि राज ठाकरे यांची मनसे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीला लागण्यासाठी काही काम केले, काही कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेतले, तर त्यांच्या हाती काही यश लागण्याची देखील शक्यता आहे. कारण अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काहीसे वातावरण आहे. फडणवीस सरकारने मदत जाहीर करून सुद्धा ती अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही याविषयी असंतोष आहे म्हणून तर बच्चू कडू यांच्या आंदोलनाला विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. मनोज जरांगे यांनासुद्धा बच्चू कडू यांच्या आंदोलनात घुसावेसे वाटले. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सध्याच्या राजकीय वातावरणाची चुणूक बच्चू कडू यांच्या शेतकरी आंदोलनात दिसली. अर्थातच ती सत्ताधारी महायुतीला अनुकूल नव्हती आणि नाही.
– एकतर्फी यश कुणालाच नको
या पार्श्वभूमीवर पुढच्या दोन-तीन महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका ज्या टप्प्यांमध्ये होतील, त्यामध्ये ठाकरे बंधूंच्या दोन्ही पक्षांची युती आणि पवार काका पुतण्या यांच्या पक्षांना मिळणारे यश हे समान राहिले, तर त्यातून भाजपला फायदाच होण्याची शक्यता आहे. किंबहुना दोन ठाकरे आणि दोन पवार यांचे समान यश भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकी सारखे निकाल लागले, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर मोठी राजकीय कुरघोडी करू शकतात. त्यातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले, तरी शिंदे आणि अजित दादा यांचे राजकीय उपद्रव मूल्य वाढू शकते. याची भविष्यात भाजपला डोकेदुखी ठरू शकते.
– Checks and balance स्थिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात एक नंबर वर राहील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही पण त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांना सुद्धा भाजप सारखेच अभूतपूर्व यश मिळूनही भाजपला ते अनुकूल ठरण्याची शक्यता नाही. उलट शिंदे आणि अजितदादांची वाढती ताकद भाजपला त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा दोन ठाकरेंच्या युतीला आणि पवार काका – पुतण्यांच्या पक्षांना साधारणपणे समसमान यश मिळाले, तर महाराष्ट्रात चार प्रादेशिक पक्षांचे विशिष्ट राजकीय स्थान कायम राहील आणि कुणाचेही उपद्रव मूल्य जास्त वाढणार नाही किंवा ते अतिरिक्त कमी सुद्धा होणार नाही. त्यातून भाजपसाठी महाराष्ट्रात राजकीय checks and balance ची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. काँग्रेसचे संभाव्य यश मोठ्या प्रमाणावर घटेल. भाजपचे नेतृत्व राजकीय दृष्ट्या परिपक्व असेल, तर ते चौघा – पाच जणांना वेगवेगळ्या प्रकारे “खेळवू” शकेल अन्यथा कुठल्यातरी दोन किंवा तीन प्रादेशिक पक्षांना जास्त यश आणि अन्य पक्षांना मोठे अपयश हे भाजपसाठी राजकीय दृष्ट्या धोक्याची घंटा ठरू शकेल.
How checks and balance will emerge after local elections in Maharashtra?
महत्वाच्या बातम्या
- गड-किल्ल्यांवरील नमो पर्यटन सेंटरवरून राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Israel-Gaza : युद्धबंदीच्या 17 दिवसांनंतर इस्रायलचा गाझावर भीषण हल्ला; 140 नागरिक ठार, हमासला ट्रम्प यांची धमकी
- 17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!
- India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार
