• Download App
    मुंबईमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा। Hostel for working women in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad's announcement

    मुंबईमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. Hostel for working women in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad’s announcement



    आव्हाड म्हणाले, मुंबईत राज्यभरातून महिला नोकरीसाठी येतात. मात्र त्यांना उपनगरांमध्ये राहावे लागते. त्यामुळे प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे ‘म्हाडा’ अंतर्गत ताडदेव येथील एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी हे सुसज्ज वसतिगृह उभारणार आहे.

    सहा महिन्यात काम सुरु

    मंत्रालय, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड अशा ठिकाणांपासून हे वसतिगृह जवळ असेल. त्यामुळे महिलांचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार आहे. 450 खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षात उभारले जाणार आहे. सहा महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होईल.

    35 कोटी रुपये एवढा खर्च

    या कामासाठी अंदाजे 35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. वसतिगृह उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल. त्यामुळे गुणवत्ता व सोयीसुविधांवर परिणाम होणार नाही, असेही आव्हाड यांनी सागितले.

    Hostel for working women in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad’s announcement

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती