या जप्त केलेल्या गांजाची ६.६९ लाख रुपये किंमत आहे.गांजाची लागवड केलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.Hingoli: 76 kg cannabis seized from turmeric field; Accused arrested
विशेष प्रतिनिधी
हिंगोली : राज्यासह जिल्ह्यात देखील गुटखा, गांजा यावर बंदी आहे.दरम्यान हळदीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.ही घटना वसमत तालुक्यातील गुंडा शिवारात घडली आहे.
दरम्यान हट्टा ग्रामीण पोलीस पथकाने छापा टाकून या हळदीच्या शेतातुन तब्बल ७६ किलो गांजा जप्त केला आहे. दरम्यान या जप्त केलेल्या गांजाची ६.६९ लाख रुपये किंमत आहे.गांजाची लागवड केलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गुंडा शिवारातील शेतकरी उत्तम मारोतराव भालेराव यांनी आपल्या शेतात हळदीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केली होती. ही माहिती मिळताच १ डिसेंबर रोजी हट्टा ग्रामीण पोलिस पथकाने घटनास्थळी छापा मारला.दरम्यान यावेळी हळदीच्या शेतात 143 गांजाची झाडे आळून आली असता याप्रकरणी उत्तम मारोतराव भालेराव यास अटक केली.
Hingoli: 76 kg cannabis seized from turmeric field; Accused arrested
महत्त्वाच्या बातम्या
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवेंद्र शहा यांच्या पराग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे 428 कोटींचे बोगस व्यवहार?
- आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर रांगोळी स्पर्धा
- कलम ३७० हटविल्याचे दिसू लागले दृश्य परिणाम, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट
- साहित्य संमेलनासाठी अखेर फडणवीस यांना निमंत्रण, छगन भुजबळ यांची मध्यस्ती