• Download App
    दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव बसची धडक, वडिलांचा मृत्यू|High speed Pmpml bus dash two wheelar, one dead in yavat

    दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव बसची धडक, वडिलांचा मृत्यू

    घरातील पीठ संपल्याने दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या बसची धडक बसली. यात वडील बसखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री पुणे-सोलापुर मार्गावर यवत येथे घडला.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे –घरातील पीठ संपल्याने दुचाकीहून पीठ आणण्यासाठी गेलेल्या पीता-पुत्राच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या बसची धडक बसली. यात वडील बसखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी रात्री पुणे-सोलापुर मार्गावर यवत येथे घडला.High speed Pmpml bus dash two wheelar, one dead in yavat

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात गजानन नलेगावकर (वय -५६) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा आदर्श नलेगावकर गंभीर जखमी झाला. हे दोघे गुरुवारी रात्री पीठ आणण्यासाठी जात होते. पुणे सोलापूर मार्गावर पीएमपीएमएल बस मुख्य महामार्गावरून सेवा रस्त्यावर वळत असताना त्यांच्या दुचाकीला धडकली.



    यात गजानन नेलगावकर हे बस खाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर आदर्श हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पिता पुत्र यांची परिस्थीती हलाखीची आहे. घरातील मुख्य व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.

    High speed Pmpml bus dash two wheelar, one dead in yavat

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ