• Download App
    चोरीला गेलेल्या सुवर्णगणेशाची पुनर्स्थापना करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी, दिवेआगर पुन्हा भाविकांनी गजबजणार |High court gives permission for ganesh mandir

    चोरीला गेलेल्या सुवर्णगणेशाची पुनर्स्थापना करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी, दिवेआगर पुन्हा भाविकांनी गजबजणार

    विशेष प्रतिनिधी 

    मुंबई : दिवेआगर येथील चोरीला गेलेल्या सुवर्णगणेशाची पुनर्स्थापना करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. वितळवलेल्या मूर्तीचे सोने सध्या न्यायालयाच्या ताब्यात असून ते राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. त्यापासून पूर्वीप्रमाणे मुखवटा तयार करून नव्या मंदिरात त्याची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.High court gives permission for ganesh mandir

    17 नोव्हेंबर 1997 रोजी दिवेआगर येथील द्रौपदीबाई धर्मा पाटील यांच्या शेतात खोदकाम करताना एका तांब्याच्या पेटीत सोन्याच्या गणपतीसह काही दागिने सापडले होते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणपती मंदिरातील सुरक्षारक्षकांचा 23 मार्च 2012 रोजी खून करून गणपतीच्या सोन्याच्या मुखवट्याची आणि दागिन्यांची चोरी झाली होती.



    पोलिस तपास पूर्ण करून अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपींना शिक्षाही ठोठावली. आरोपींनी मुखवटा वितळवून लगड तयार केले. 1361 ग्रॅमचे लगड जप्त करण्यात पोलिसांना यश आले.आरोपींनी मुंबई उच न्यायालयात शिक्षेविरुद्ध अपील दाखल केल्यामुळे सोन्याचा वापर करता येत नव्हता.

    त्यामुळे त्याच सोन्यापासून पुन्हा मुखवटा बनवला जावा अशी भाविकांना आशा होती. परत मिळवण्यात आलेल्या सोन्यापासून मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. ताला मुंबई उच न्यायालयाने परवानगी दिली

    High court gives permission for ganesh mandir

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस