• Download App
    सचिन पाटील नावाने लपला, एनजीओचा मेंबर असल्याचा बनाव, पुणे पोलिसांनी दिली संपूर्ण माहितीHiding under the name of Sachin Patil, pretending to be a member of an NGO, Pune Police gave complete information

    सचिन पाटील नावाने लपला, एनजीओचा मेंबर असल्याचा बनाव, पुणे पोलिसांनी दिली संपूर्ण माहिती

    पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. यादरम्यान केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केलीHiding under the name of Sachin Patil, pretending to be a member of an NGO, Pune Police gave complete information


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी याला महाराष्ट्रातील पुणे येथून अटक करण्यात आली आहे.चिन्मय देशमुख फसवणूक प्रकरणी गोसावी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोसावीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. यादरम्यान केपी गोसावीची पुणे पोलिसांनी तासभर कसून चौकशी केली.

    पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी चौकशीत समोर धक्कादायक माहिती सांगितली आहे. गोसावी हा सचिन पाटील हे नाव धारण करून तो परराज्यात लपत होता. सचिन नावाने त्याने अनेकांची फसवणूक केली. काही एनजीओचा पदाधिकारी असल्याचीही तो बतावणी करत होता.

    पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की , केपी गोसावी सचिन पाटील या नावाने लपत होता. लखनऊच्या हॉटेलमध्येही तो याच नावाने राहिला होता. त्याचा आम्ही तपास करत आहोत. तसेच तो एनजीओचा मेंबर असल्याची बतावणी करायचा. स्टॉप क्राईम ऑर्गनायजेशन आणि सिप्का कंपनीचा सदस्य असल्याचंही तो लोकांना सांगत होता. एक्सपोर्ट इम्पोर्टचा त्याचा व्यवसाय आहे. तसेच जॉब प्लेसमेंटचही तो काम करतो. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं गुप्ता यांनी सांगितलं.



    या प्रकरणात कोणतंही राजकारण नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. गेल्या दहा दिवसांपासून तो कुठे कुठे लपला होता याची आम्ही माहिती घेतली. तो हैदराबाद आणि लखनऊमध्ये असल्याचं कळलं होतं. त्यानुसार आम्ही कारवाई केली, असंही त्यांनी सांगितलं.

    गोसावीला अटक करण्यात आम्हाला चिन्मय देशमुख यांनी बरीच मदत केली. चिन्मयने आम्हाला जी माहिती दिली ती चार्जशीटमध्ये दाखल करणार आहोत. चार्जशीटमध्ये ज्या ज्या गोष्टी राहून गेल्या आहेत, त्या सर्व नमूद केल्या जातील, असंही गुप्ता यांनी सांगितलं.

    पुढे गुप्ता म्हणाले की , आम्ही तूर्तास आमच्या केसवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आर्यन खान प्रकरणावर फोकस नाही. नंतर या गोष्टी येतील असं सांगतानाच एनसीबीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही, तसेच गोसावीला आपल्याकडे सुपूर्द करण्यासाठी मुंबई पोलिसांसह कोणत्याही एजन्सीने आमच्याशी संपर्क साधला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

    Hiding under the name of Sachin Patil, pretending to be a member of an NGO, Pune Police gave complete information

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस