• Download App
    हॅलो, मी शरद पवार बोलतोय! सिल्वर ओकवरून बदल्यासंदर्भात कॉल, असे सांगितल्याने मंत्रालयात उडाली खळबळ|Hello, I am Sharad Pawar talking! The call from Silver Oak regarding the transfer caused a stir in the mantralaya

    हॅलो, मी शरद पवार बोलतोय! सिल्वर ओकवरून बदल्यासंदर्भात कॉल, असे सांगितल्याने मंत्रालयात उडाली खळबळ

    वृत्तसंस्था

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या  आवाजात एकाने मंत्रालयात फोन केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल झाला आहे.Hello, I am Sharad Pawar talking! The call from Silver Oak regarding the transfer caused a stir in the mantralaya

    मंत्रालयात बुधवारी रात्री एक फोन खणखणला आणि एकाच तारांबळ उडाली. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून हा फोन केला आहे, असे त्या व्यक्तीने सांगितले.पण, तो फोन शरद पवार यांनी केला की, अन्य कोणी याचा तपास पोलिस करत आहेत. शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात कॉल केला होता. त्यानंतर मंत्रालयात गोंधळ उडाला.

    मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर गावदेवी ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. मंत्रालयात कॉल आल्यानंतर या कॉलची पडताळणीसाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन करण्यात आला. पडताळणीनंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून केला नसल्याचे सांगितले गेले. मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.



    त्यानुसार पोलिस शिपायाने गावदेवी पोलिस गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे या खोट्या कॉलच्या प्रकरणात गावदेवी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे लगेच देण्यात आले आहे.

    दरम्यान, या प्रकरणात खंडणीविरोधी पथकाने एकाला पुण्यातील जेऊर येथून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती कोण आहे, त्याने कुणासाठी पवार यांचा आवाज काढत कॉल केला होता, या संदर्भात पोलिसांनी मोठी गुप्तता पाळलेली आहे. तसेच कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत हा फोन केला होता, याबाबतची माहिती पोलिसांनी दिलेली नाही.

    मंत्रीमहोदयावर गंभीर आरोप, गुन्हा मात्र नाही

    आरोप झाले म्हणजे ते सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तीला दोषी किंवा आरोपी ठरवू नये, असे खुद्द शरद पवारच अनेकदा सांगत असतात. आता त्यांच्याच आवाजात फोन करणाऱ्या व्यक्तीवर मात्र, लगेच गुन्हा कसा काय दाखल झाला ? याचे गूढ कायम आहे. महाविकास आघाडीतील मंत्रीमहोदयावर यापूर्वी अनेक गंभीर आरोप झाले आहेत

    . पण, कठोर कारवाई मात्र झालेली नाही. केवळ आरोप झाले म्हणजे गुन्हा दाखल झालाच पाहिजे का ? , असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला जात होता. ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते शेंबड’ ,असा कारभार राज्यात सुरु असल्याचे यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

    Hello, I am Sharad Pawar talking! The call from Silver Oak regarding the transfer caused a stir in the mantralaya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस