विशेष प्रतिनिधी
पुणे: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदूरबार, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांत काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.Heavy rainfall forecast in Konkan, Marathwada, North Maharashtra and some districts of Vidarbha
गेल्या चोवीस तासांत विदर्भात अनेक ठिकाणी, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. सोमवारी (३० ऑगस्ट) संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला.
मुंबई आणि पुण्यात हलक्या सरी कोसळल्या.राज्यातील सर्व धरणांत मिळून गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. पुणे शहरात ऑगस्टअखेर ४३५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना तो चारशे मिलिमीटरचा टप्पाही पूर्ण करू शकलेला नाही. पुणे जिल्ह्यात १ टक्क्यांनी पाऊस कमी आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, मराठवाड्यातील हिंगोली, कोकण विभागातील पालघर आदी जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी आहे.
Heavy rainfall forecast in Konkan, Marathwada, North Maharashtra and some districts of Vidarbha
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती मंत्री अनिल परबांमागे ED पाठोपाठ बढती भ्रष्टाचार चौकशीचे शुक्लकाष्ट
- राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर ट्रम्प संतापले, म्हणाले की- सैन्य माघारी घेण्याची मोहीम कधीही एवढ्या वाईट पद्धतीने राबवली गेली नाही
- कॅगने केले ममता सरकारचे कौतुक, म्हटले – ‘लॉकडाऊन असूनही, जमाखर्चाचा ताळेबंद १०० % जुळला
- Bollywood Drug Case : अरमान कोहलीच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासा, पेरू-कोलंबियाहून ड्रग्जचा पुरवठा; मोठ्या ड्रग कार्टेलशी संबंध