विशेष प्रतिनिधी
मुंबई – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत राज्यात अनेक भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.Heavy rain will occur in Maharashtra says IMD
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना मंगळवारी (ता.६) ‘ऑरेंज अलभर्ट’’ दिला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलजर्ट’ आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधारेची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत उत्तर आणि उत्तर-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
Heavy rain will occur in Maharashtra says IMD
महत्त्वाच्या बातम्या
- इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरु अल हकीम यांचे निधन
- तब्बल ५० हजार अफगाणी निर्वासितांना अमेरिका स्वीकारणार , अन्य देशही येणार पुढे
- सर्वसमावेशक सरकारला आकार देण्यात तालिबानला अद्यापही यश नाहीच
- निवडणूक आयोगा आला ममतादीदींच्या मदतीला धावून, भवानीनगरची पोटनिवडणूक होणार ३० सप्टेंबरला
- पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेला भेट देणार, आमसेभेतही भाषण होण्याची शक्यता