• Download App
    भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थान, तर राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती Haribhau Bagde has been appointed as the Governor of Rajasthan, while Radhakrishnan has been appointed as the Governor of Maharashtra

    भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थान, तर राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करून त्यांच्या जागी झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन‌ यांची नियुक्ती झाली. Haribhau Bagde has been appointed as the Governor of Rajasthan, while Radhakrishnan has been appointed as the Governor of Maharashtra

    बागडे यांच्या रूपाने संभाजीनगरला प्रथमच राज्यपालपदाचा मान मिळाला. राष्ट्रपती कार्यालयाकडून शनिवारी रात्री 10 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांची घोषणा झाली. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होत आहेत. यंदा अस्थिर राजकीय परिस्थितीची शक्यता असल्याने राधाकृष्णन‌ यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले हरिभाऊ बागडे यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. राज्यात भाजप बाळसे धरत असताना १९८५ मध्ये तत्कालीन औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ते सर्वप्रथम आमदार झाले. १९९५ मध्ये रोहयो मंत्री झाले. २००९ मध्ये फुलंब्रीतून त्यांचा पराभव झाला. मात्र नंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा ते पुन्हा आमदार झाले. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधवांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बागडे चक्क दुचाकीवर आले होते.

    पुरोहित यांचा राजीनामा मंजूर; ओम माथूर यांच्याकडे सिक्कीम

    नागपूरचे बनवारीलाल पुरोहित पंजाबचे राज्यपाल होते. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला. त्यांच्या जागी आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती. राजस्थानचे भाजप नेते ओमप्रकाश माथूर (सिक्कीम), त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री जिष्णुदेव वर्मा (तेलंगण), माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार (झारखंड), आसामचे माजी खासदार रमण डेका (छत्तीसगड), सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य (अासाम) व सी.एच. विजयशंकर (मेघालय) तर गुजरातचे निवृत्त आयएएस अधिकारी के. कैलाशनाथन पुद्दुचेरीचे राज्यपाल असतील.

    राधाकृष्णन तामिळनाडूतील स्वयंसेवक

    तामिळनाडूचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष व कोइम्बतूरमधून दोनदा खासदार राहिलेले ६८ वर्षीय राधाकृष्णन यांना फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वप्रथम झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक देण्यात आली. मार्च २०२४ पासून त्यांच्याकडे तेलंगणाचाही कार्यभार होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले राधाकृष्णन १९९८ व १९९९ या दोन टर्ममध्ये खासदार झाले. त्यापूर्वी भाजपच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. कॉलेज काळात ते उत्कृष्ट खेळाडू होते. राज्यशास्त्र विषयातून त्यांनी ‘साम्राज्यवादाचे पतन’ याविषयी पीएचडी केलेली आहे.

    Haribhau Bagde has been appointed as the Governor of Rajasthan, while Radhakrishnan has been appointed as the Governor of Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस