विशेष प्रतिनिधी
पुणे : बायकोकडूनच नवऱ्या चा छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला आहे. शिवीगाळीबरोबरच बायको सतत नपुंसक म्हणून हिणवत असल्याने बदनामी होत असल्याने नवऱ्याने पोलीसांकडे धाव घेतली. मात्र, बायकोकडून छळ होतोय हे मानायलाच पोलीस तयार नव्हते. त्यामुळे शेवटी नवऱ्याने न्यायालयात धाव घेतली.Harassment from wife, defamation of being impotent, ran to court as police did not lodge complaint
न्यायालयाच्या आदेशानंतर नवऱ्याची तक्रार घेऊन पोलिसांनी त्याच्या बायकोसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते २३ जानेवारी २०२१ दरम्यान घडला आहे. त्यामुळे 30 वर्षीय व्यक्तीने समर्थ पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे.
या नवऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची बायको वारंवार काहीना काही कारणं शोधून त्याच्यासोबत भांडण काढायची आणि शिवीगाळ करायची. त्याला धमक्याही देत होती. इतर आरोपी हे संसारात हस्तक्षेप करुन त्याच्या घरच्यांची बदनामी करु अशा धमक्या देत शिवीगाळ करायचे.
बायको माझा नवरा नपुंसक आहे, असे खोटे बोलून त्याची बदनामी करु लागली आणि त्याला मानसिक त्रास देऊ लागली.नवºयाने न्यायालयात तक्रार केल्यावर न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार समर्थ पोलिसांनी या प्रकरमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी या घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत.
Harassment from wife, defamation of being impotent, ran to court as police did not lodge complaint
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल