प्रतिनिधी
मुंबई : मातोश्रीवर येऊन उद्या सकाळी 9.00 वाजता हनुमान चालीसा वाचणार असे जे आव्हान खासदार नवनीत राणा आणि रवी आमदार रवी राणा या दाम्पत्याने दिले आहे ते आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. किंबहुना आत्तापर्यंत “वर्षा”वर मुक्कामाला असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी मातोश्रीवर दाखल होत राणा दाम्पत्याला प्रति आव्हानच दिले आहे…!!Hanuman Chalisa: CM’s challenge to Rana couple coming to Matoshri !!; Demonstration of strength of Shiv Sainiks
मातोश्रीवर येऊन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने आधीपासूनच दिले होते. आज राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले, तेव्हा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनीही प्रचंड गर्दी करून शिवसेनेच्या समर्थनाच्या आणि राणा दांपत्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन केले.
राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, अशी नोटीस बजावली. ही नोटीस स्वीकारल्यानंतर राणा दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन मातोश्रीवर जाऊन उद्या सकाळी 9.00 वाजता हनुमान चालीसा वाचण्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवला.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी “वर्षा” निवासस्थानातून बाहेर पडून ते सायंकाळी मातोश्रीवर दाखल झाले. मातोश्रीवर दाखल होताना कलानगरच्या गल्लीत ते चालत आले. शिवसैनिकांना अभिवादन करत ते मातोश्री मध्ये गेले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार विनायक राऊत, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे मंत्री देखील होते. उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल होत असताना आणि कलानगरच्या गर्दीत चालत असताना शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना अभिवादन करत त्यांचे मनोधैर्य उंचावले.
या शक्तिप्रदर्शनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी राणा दांपत्याला प्रति आव्हानच देऊन टाकले. आता उद्या सकाळी 9.00 वाजता राणा दांपत्य मातोश्रीवर दाखल होऊन हनुमान चालीसा वाचणार आहे. त्यावेळी नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Hanuman Chalisa: CM’s challenge to Rana couple coming to Matoshri !!; Demonstration of strength of Shiv Sainiks
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी साहित्य संमेलनांना शरद पवारांशिवाय दुसरा पाहुणा सापडेना… गेल्या दहापैकी सात संमेलनांच्या व्यासपीठावर पवारच!
- आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी ८७ कोटी रुपयांचा धनादेश पुणे महानगरपालिकेकडे सूपूर्द
- राष्ट्रीयकृत बँकेत ९० टक्के भ्रष्टाचार होऊन ही त्याबाबत चर्चा होत नाही – अजित पवार
- टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने काढले वर्गाबाहेर; ब्राह्मण समाजातील लोक संतप्त