• Download App
    Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!|Hanuman Chalisa: CM's challenge to Rana couple coming to Matoshri !!; Bhajan with Taal Mridunga in front of Rana's house in Khar of Shiv Sainiks

    Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मातोश्रीवर येऊन उद्या सकाळी 9.00 वाजता हनुमान चालीसा वाचणार असे जे आव्हान खासदार नवनीत राणा आणि रवी आमदार रवी राणा या दाम्पत्याने दिले आहे ते आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. किंबहुना आत्तापर्यंत “वर्षा”वर मुक्कामाला असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी मातोश्रीवर दाखल होत राणा दाम्पत्याला प्रति आव्हानच दिले…!! मात्र, त्यानंतर राणा दांपत्य मातोश्रीकडे फिरकूच नये यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या खार मधल्या निवासस्थानासमोर पहारा द्यायला सुरुवात केली असून आज रात्रभर शिवसैनिक तिथे बसून राहणार आहेत.Hanuman Chalisa: CM’s challenge to Rana couple coming to Matoshri !!; Bhajan with Taal Mridunga in front of Rana’s house in Khar of Shiv Sainiks

    शिवसैनिकांनी राणांच्या निवासस्थानासमोर टाळ मृदुंगासह भजन कीर्तन करून राणांचा निषेध केला. राणा दाम्पत्य जरी उद्या सकाळी 9.00 वाजता मातोश्री वर जाणार असले तरी आज सायंकाळी शिवसैनिकांनी त्यांच्या घरासमोर जय जय राम कृष्ण हरी अशी भजने म्हटली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खार मध्ये देखील बंदोबस्त वाढवला आहे. राणा दाम्पत्याला उद्या घराबाहेर पडू द्यायचे नाही असा चंग शिवसैनिकांनी बांधल्याचे सांगितले जात आहे.



    मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

    मातोश्रीवर येऊन मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान राणा दाम्पत्याने आधीपासूनच दिले होते. आज राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले, तेव्हा मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनीही प्रचंड गर्दी करून शिवसेनेच्या समर्थनाच्या आणि राणा दांपत्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या होत्या. शिवसेनेने मोठे शक्तिप्रदर्शन केले.

    राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, अशी नोटीस बजावली. ही नोटीस स्वीकारल्यानंतर राणा दाम्पत्याने पत्रकार परिषद घेऊन मातोश्रीवर जाऊन उद्या सकाळी 9.00 वाजता हनुमान चालीसा वाचण्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवला.

    या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी “वर्षा” निवासस्थानातून बाहेर पडून ते सायंकाळी मातोश्रीवर दाखल झाले. मातोश्रीवर दाखल होताना कलानगरच्या गल्लीत ते चालत आले. शिवसैनिकांना अभिवादन करत ते मातोश्री मध्ये गेले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार विनायक राऊत, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे मंत्री देखील होते. उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल होत असताना आणि कलानगरच्या गर्दीत चालत असताना शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना अभिवादन करत त्यांचे मनोधैर्य उंचावले.

    या शक्तिप्रदर्शनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी राणा दांपत्याला प्रति आव्हानच देऊन टाकले. आता उद्या सकाळी 9.00 वाजता राणा दांपत्य मातोश्रीवर दाखल होऊन हनुमान चालीसा वाचणार आहे. त्यावेळी नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Hanuman Chalisa: CM’s challenge to Rana couple coming to Matoshri !!; Bhajan with Taal Mridunga in front of Rana’s house in Khar of Shiv Sainiks

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांचा विरोध मोडून मुख्यमंत्री फडणवीसांची थोपटेंच्या राजगड साखर कारखान्याला मदत; पुणे जिल्ह्यातल्या दादागिरीला लागोपाठ दुसरा धक्का!!

    Police sent back Laxman Hake : गेवराईत निघालेल्या लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी परत पाठवले; वडीगोद्रीत पोलिस बंदोबस्त वाढवला

    Manoj Jarange : मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करायला हायकोर्टाने केली मनाई; पण जरांगेंनी केली फडणवीसांवर आगपाखड!!