• Download App
    Gunratna Sadavarte Alleges Shinde Group Directors Tried to Disgrace Tribal Women in ST Bank Brawl; Case Filed at Nagpada Police Station मुंबई ST बँकेतील हाणामारीवर गुणरत्न सदावर्ते संतप्त; आदिवासी महिलेला बेअब्रू करण्याचा आरोप

    Gunratna Sadavarte : मुंबई ST बँकेतील हाणामारीवर गुणरत्न सदावर्ते संतप्त; आदिवासी महिलेला बेअब्रू करण्याचा आरोप

    Gunratna Sadavarte

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Gunratna Sadavarte मुंबई एसटी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे.Gunratna Sadavarte

    मुंबई एसटी बँकेत बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत वकील गुणरत्न सदावर्ते व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांच्या संचालकांत वादावादी झाली होती. या वादावादीचे रुपांतर नंतर प्रत्यक्ष हाणामारीत झाले. संचालकांनी एकमेकांवर माईक फेकले. त्यात 2-3 संचालक जखमी झाले. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी महिला संचालकांपुढे अश्लील हावभाव केल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे.Gunratna Sadavarte



    महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले

    सदावर्ते म्हणाले, कालच्या घटनेप्रकरणी आम्ही कुणाचेही नाव घेणार नाही. कारण, कायद्यात तसे नमूद आहे. पण कालच्या बैठकीत आमच्या महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले. आमची एक बहीण मराठा समाजाची होती. दुसरी वंजारी समाजाची होती. तिसरी आदिवासी समाजाची होती. या सर्वच बहिणींविषयी बैठकीत अपशब्द वापरण्यात आले. विशाखा गाईडलाईन्सनुसार याचा समावेश महिला अत्याचारात होतो. पण या लोकांनी ते ही करून पाहिले. हे लोक त्या बैठकीत कसे व्यक्त झाले? हे सुद्धा आता पुराव्यानिशी कायदेशीर सत्य आहे.

    आदिवासी महिलेला बेअब्रू करण्याचा प्रयत्न

    या प्रकरणी काल एफआयआर दाखल झाला आहे. त्यातील तथ्य हे अत्यंत गंभीर आहेत. हे लोक कशाप्रकारे वर्तन करत होते हे त्यात आले. आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला. हे त्या एफआयआरमध्ये आले. या एफआयआरमध्ये विनयभंगाचा मुद्दा आला. आदिवासी महिलेवरील ॲट्रोसिटीच्या घटना रेकॉर्डवर येत नाहीत. पण कालची वस्तुस्थिती बोलकी आहे. दिसती आहे. मुंबई महानगरात घडली आहे. ते सुद्धा रेकॉर्डवर आले आहे. पोलिसांनी अत्यंच सचोटीने कालचा एफआयआर त्या लोकांविरोधात नोंदवला आहे.

    7 वर्षे ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद

    मला त्या लोकांना सांगायचे आहे की, त्यांच्याविरोधातील कलमांतर्गत त्यांना 7 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. असे गंभीर कलमे त्या लोकांविरोधात पोलिसांनी काल नोंद केले आहेत. त्याचे पुरावे पोलिसांनी अत्यंत काळजीने एकत्रित केले आहेत. त्यामुळे या लोकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आमच्या संचालकांविरोधात एक थातूरमातूर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात दंडाधिकारीस्तरीय शिक्षा होण्याचीही तरतूद नाही. किंबहुना आम्हाला पोलिसांपुढे जाऊनच त्या केसचा निपटारा करता येईल. त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी झाले आहे, असे सदावर्ते म्हणाले.

    आनंदराव अडसूळ यांच्यावर साधला निशाणा

    गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, एसटी बँकेच्या राड्यानंतर आनंदराव अडसूळ पोलिस ठाण्यात का गेले? ते अनुसूचित जाती – जमातीच्या लोकांवर अत्याचार केलेल्या आरोपींना पाठिंबा देण्यासाठी गेले होते का? त्यांच्याविरोधात बँक बुडवल्याचे आरोप आहेत. आयोगाच्या जातीतील लोकांविरोधातच हा माणूस अत्याचार करत आहे. याचा रोल काय आहे? अडसूळ यांची आयोगातून हकालपट्टी करा. हे लै जुने म्हातारे आहे म्हणून एकनाथ शिंदे त्यांना आपल्यासोबत ठेवत असतील. पण शिंदे असा लैंगिक अत्याचार करणाऱ्या पाठबळ द्या असे केव्हाच म्हणणार नाहीत. मी अडसूळांची शिंदेंकडे तक्रार करेन, असे ते म्हणाले.

    Gunratna Sadavarte Alleges Shinde Group Directors Tried to Disgrace Tribal Women in ST Bank Brawl; Case Filed at Nagpada Police Station

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ज्या जिल्ह्यात जाऊन पवार टाकायचे “डाव”, तिथे जाऊन फडणवीसांची “खेळी”; राष्ट्रवादी झाली “खाली”!!

    ठाकरे + पवारांनी आपले 13 खासदार लोणच्यासारखे मुरवत ठेवलेत का??

    बारामतीत अजितदादांनी अनुभवला विविध क्रीडा स्पर्धांचा थरार; पण स्वतः खेळले कॅरम!!