विशेष्ष प्रतिनिधी
मुंबई : Gunaratna Sadavarte मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र टीका केली आहे. त्यांनी मनोज जरांगेला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, असे म्हटले आहे. जरांगेचे आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, असेही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.Gunaratna Sadavarte
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. सुरुवातील मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी दिली होती. त्यानंतर त्यांना आजच्या दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. पण त्यांना उद्याची मुदतवाढ न दिल्यास मनोज जरांगे काय निर्णय घेतात? हे पाहावे लागणार आहे. तत्पूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला चढवला.Gunaratna Sadavarte
नेमके काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
मनोज जरांगेला कायद्यासमोर मोठे समजू नये. आज सहावाजेपर्यंत जरांगेने ऐकले नाही, तर चुकीची प्रथा पडेल. पहिल्याच आंदोलनात नियम तुटणार असतील, तर ही श्रृखंला पुढे चालेल, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. कायद्याचे राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो याआधारवर आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी सहा वाजेनंतर जरांगेचे लाड बंद करावे आणि जरांगेला अटक करून कोर्टासमोर हजर करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही, असेही त्यांनी म्हटले.Gunaratna Sadavarte
पॉलिटिकल लडाखे पोलिसांशी हुज्जत घालत आहेत
गुणरत्न सदावर्ते यांनी काही आंदोलकांना ‘पॉलिटिकल लडाके’ म्हटले आहे. ते म्हणाले, काही लोक जाणूनबुजून रस्ता रोको करून पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. त्यांना माहिती आहे? आता लोकांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. हे मराठा बांधव नाहीत, तर पॉलिटिकल लडाके आहेत. पोलिसांमध्ये आक्रमकता यावी, पोलिस अॅक्शन मोडमध्ये यावे त्यातून काही आक्रमकता व्हावी, मुंबईतील सामान्य माणसाला त्रास होऊ नये, यासाठी प्रतिबंधकात्मक कारवाई करताना काहीतरी अघटित घडवून, महाराष्ट्र पेटवू इच्छित आहेत. त्यानंतर जरांगेच्या नावाने व्हिक्टीम कार्ड खेळावे, असे हे सगळे करून शोषण करण्यासाठीचे आरक्षण मागणे आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.
शरद पवारांना संवैधानिक मर्यादा माहीत पाहिजे
संविधानात बदल करा, असे शरद पवार बोलतात. संवैधानिक मर्यादा काय आहेत? जागा खुल्या किती राहाव्यात याबाबत बाबासाहेब आंबेडकरांचे मत काय? हे शरद पवारांना माहीत पाहिजे. बाबासाहेब आंबेकर हे खुल्या जातीचे रखवाले आहेत. संजय राऊत आणि शरद पवार हे तेच लोक होते का, जे अॅट्रोसिटीचा कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुढे करत होते. कारण संविधानातूच अॅट्रोसिटीचा कायदा निर्माण झाला होता. संविधानातून आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे. आता यांचे खरे दात दिसायला लागले आहे. हेच लोक पडद्याआड सामाजिक अत्याचाराशी संबंधित कायदा या देशात राज्यात असू नये, यासाठी पडद्यामागून खेळ खेळत होते का? असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्थित केला.
संजय राऊत आणि शरद पवार यांनी संविधान बदला म्हटले. यावर काय उत्तर आहे? हे विचारले पाहिजे, अशा शब्दांत सदावर्ते यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. हे फसवाफसवी करत आहेत. आरक्षण देता येत नाही, हे त्यांना माहिती आहे. मराठा आणि ओबीसी भावांची फसवाफसवी करून खेळ खेळत आहेत, असेही सदावर्ते म्हणाले.
जरांगेला त्याच्या गावी धाडावे
न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मनोज जरांगे यांच्यासमोर हताश दिसत होते. जरांगे म्हणत होता की, मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्या, मात्र ते त्यावर काहीच बोलत नव्हते. त्यांनी कोर्टात असल्याप्रमाणे सांगायला हवे होते. जरांगेचे आंदोलन आटोपते घेऊन त्याला त्याच्या गावी धाडावे, असेही सदावर्ते म्हणाले.
Gunaratna Sadavarte Criticizes Manoj Jarange Demands Protest End
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!
- Gujarat : गुजरातेत माजी आमदार, IPS सह 14 जणांना जन्मठेप; सुरतेत बिल्डरचे अपहरण करून 12 कोटींचे बिटकॉइन ट्रान्सफर केले
- Droupadi Murmu : जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे भारत-चीन संबंध सुधारल्याचा दावा; राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिले- ट्रम्पच्या टॅरिफमुळे आम्हाला त्रास
- Mahua Moitra controversial statement : महुआ मोइत्रांना अमित शाहांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार?: पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल