• Download App
    नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन । Gudi Pujan in the Kalaram temple area of ​​Nashik

    नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन

    प्रतिनिधी

    नाशिक : नाशिकचे सुप्रसिद्ध काळाराम मंदिर परिसरात उत्साहात गुढी पूजन करण्यात आले. नव वर्ष स्वागत समितीच्या वतीने पारंपरिक गुढी उभारून आज पहाटे भारत मातेचे देखील पूजन करण्यात आले. Gudi Pujan in the Kalaram temple area of ​​Nashik

    यावेळी पुरोहित वर्ग तसेच नववर्ष स्वागत समितीचे सचिव जयंत गायधनी व अन्य सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या वादनाने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

     

    नाशिक शहरात ठिकठिकाणी जल्लोषात नववर्षाच्या मिरवणूका काढण्यात आल्या. यामध्ये हजारो युवक-युवती पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.

    गेली दोन वर्ष कोरोनामुळे नववर्ष स्वागताच्या मिरवणुका निघाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर यंदा सगळीकडे मोठा जल्लोष दिसला. काळाराम मंदिर परिसर, भद्रकाली मंदिर परिसर, रविवार कारंजा नाशिक शहराच्या परिसरात तसेच पंचवटीत उत्साहात मिरवणुका निघाल्या.

    भद्रकाली मंदिर परिसर साक्षी गणपती जवळ पूजन करण्यात आले यामध्ये स्वागत समितीचे प्रमुख प्रफुल्ल संचेती इतिहास संकलन समितीचे प्रमुख प्रफुल्ल संचेती, भद्रकाली मंदिराचे मुख्य पुजारी मंदार कावळे आदी सहभागी झाले होते.

     

    Gudi Pujan in the Kalaram temple area of ​​Nashik

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!