ऐतिहासिक काळाराम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना; वैदिक मंत्रोच्चारात समतेचा गजर!!
नाशिक येथील पवित्र श्री काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापना समारंभ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजा विधी आणि भक्तांच्या जयघोषात माजी राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, स्वामी श्री. गोविंददेव गिरी, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्या हस्ते धर्मध्वजाची विधिवत स्थापना करण्यात आली.