प्रतिनिधी
मुंबई : शासन लोकांच्या दारी पोहोचले, लोकांनी कृतीतून उत्तर दिले!!, अशा मोजक्या शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर आनंद व्यक्त केला.Govt reached people’s door, people responded with action!!; Happy Chief Minister Eknath Shinde
एकनाथ शिंदे म्हणाले :
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला. मी मतदारांचे आभार मानतो. महाविकास आघाडीने जी काम थांबवलेली, प्रकल्प रोखले, त्यांना आम्ही चालना दिली. राज्याच्या सर्वांगीण विकासाच धोरण आखले. या राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत तरुण, ज्येष्ठ नागरिक, भगिनी या सगळ्यांना न्याय दिला. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकालात शिंदे गटाने ठाकरे गटावर मात केली.
शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले. कृतीतून मतदारांनी हे दाखवून दिले. महायुतीवर प्रेम व्यक्त केले. महाविकास आघीडापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरपंच, सदस्य महायुतीचे निवडून आले.
मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आपपल्यापरीने लोकाभिमुख काम करण्याचा, जनतेला न्याय दिला. काहींनी फक्त आरोप, प्रत्यारोप करण्यात आणि टोमणे मारण्यात वर्ष घालवले. वर्षातला एकही दिवस टीका, टिप्पणी करण्याची संधी सोडली नाही. लोकांनी त्यांना नाकारले.
त्यांना घरी बसायची सवय होतीच
ज्या लोकांनी मतदारांशी प्रतारणा केली, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यांना जनतेने घरी बसवलं, त्यांना घरी बसायची सवय होतीच. आमच्यावर मतदारांचा विश्वास आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी काम करून विकास करू. उद्योगधंदे आणून तरुणांना स्वत:च्या पायावर उभं करू. विकासाला आणखी चालना देऊ. आधीच्या अडीच वर्षातील कामगिरी लोकांनी पाहिली, घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांनी दाखवून दिले.
Govt reached people’s door, people responded with action!!; Happy Chief Minister Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांची ५३८ कोटींची मालमत्ता जप्त ; ‘ED’ची कारवाई
- बिहारमध्ये मोठी दुर्घटना! शरयू नदीत बोट उलटली; १८ जण बुडाले, ७ बेपत्ता
- श्रद्धा कपूरसमोर तुटली पापाराझीच्या महागड्या कॅमेऱ्याची लेन्स! श्रद्धा च्या आश्वासनामुळे श्रद्धाच होते कौतुक!
- क्रिकेटच्या देवाचा वानखेडेवर पुतळा; सी. के. नायडूंनंतर सचिनला मिळाला मान आगळा !!