• Download App
    सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी; शिंदे फडणवीस सरकारची मान्यताovt employees salary before Diwali

    सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी; शिंदे फडणवीस सरकारची मान्यता

    प्रतिनिधी

    मुंबई : येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून, सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी पगार आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. Govt employees salary before Diwali

    एरवी ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी आणि इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती देण्यात आली.

    PMGKAY Scheme : केंद्र सरकारची सणांची भेट; मोफत रेशन योजनेला मुदतवाढ


    कोणाकोणाला मिळणार लाभ?

    या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

    Govt employees salary before Diwali

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महाराष्ट्रातल्या कौशल्य विकासासाठी दक्षिण कोरियातल्या लर्निंग फॅक्टरी मॉडेलची मदत; अनेक करारांवर स्वाक्षऱ्या!!

    राष्ट्रवादीवर पवार कुटुंबीयांचा संपूर्ण कब्जाचा डाव बारगळला; सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत त्याच्या खुणा दिसल्या!!

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला