• Download App
    वडेटट्टीवारांनी महाज्योतीला यड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकलीय; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल । gopichand padalkar targets vijay vadettiwar over MPSC exams issue

    वडेटट्टीवारांनी महाज्योतीला यड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकलीय; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीच्या चाळणी परीक्षेची तारीख जाहीर केली. ती अवघ्या २ दिवसानंतर अर्थात १३ सप्टेंबर घेण्याचे ठरवून टाकले. इतक्या कमी वेळेत विद्यार्थी परीक्षेला कसे येणार? या मुद्द्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवारांनी ‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे, अशा शेलक्या शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतला आहे. gopichand padalkar targets vijay vadettiwar over MPSC exams issue



    पडळकर म्हणाले, की अति सन्मानीय विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचा छळ करण्याचा जणू विडाच उचलला आहे. पण त्यांच्या वागणूकीमुळे एमपीएससी आणि युपीएससी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कडलोट होतो आहे. त्यांनी काल कुठलीही पूर्वसूचना न देता १३ सप्टेंबरला अचानक युपीएससी चाळणी परीक्षेचे आयोजन करून टाकले आहे. आता दोन दिवसांत विद्यार्थी येणार कधी? परीक्षा देणार कधी? युपीएससीचे उमेदवार दिल्लीला तयारीसाठी गेलेले असतात. काहींची १० ऑक्टोबरला पूर्व परीक्षा आहे, तर काहींच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखती आहेत, याकडे गोपीचंद पडळकरांनी लक्ष वेधले.

    विजय वडेट्टीवार यांनी आपल्या गलथान कारभारामुळे ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी असणाऱ्या ‘महाज्योती’ संस्थेला ‘यड्याची जत्रा अन खुळ्याची चावडी’ करून टाकली आहे. मी या प्रस्थापितांच्या सरकारला इशारा देतो की, चाळणी परीक्षा तुम्ही विद्यार्थ्यांशा चर्चा करून पुर्ननियोजित केली नाहीतर आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

    gopichand padalkar targets vijay vadettiwar over MPSC exams issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhumi Abhilekh : राज्यात भूमी अभिलेखची 50 नवी कार्यालये हाेणार:संभाजीनगरसह चार जिल्ह्यांत अधीक्षक कार्यालये

    Shashikant Shinde : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपलाय, शरद पवार गटाच्या बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचे मोठे विधान

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस