प्रतिनिधी
पुणे : संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे उद्घाटन पुढच्या होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.Good news for Warkaris Dehu-Alandi to Pandharpur palkhi road will be completed next year, Gadkari’s assurance that the road will be four-lane
गडकरी पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग 6 पॅकेजमध्ये असून 12 पालखी स्थळे आहेत, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग तीन पॅकेजमध्ये असून दोन्ही पालखी मार्गांचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. या मार्गावर 11 पालखी स्थळे आहेत. वर्षभराच्या आत पालखी मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल. नवीन वर्षात सुरुवातीलाच पालखी मार्ग वारकऱ्यांना उपलब्ध होईल. या मार्गाचे पुढच्या 3 महिन्यांच्या आत 60 ते 70 टक्के काम पूर्ण होईल आणि डिसेंबरअखेरीस सर्व कामे पूर्ण होतील.
नितीन गडकरी म्हणाले, पालखी मार्गावर दुपदरी रस्ता चौपदरी करण्यात आलेला आहे. शेवगाव येथे गजानन पालखी मार्गावर टाइल्स लावून मध्ये गवत लावण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांचे पाय भाजत नाहीत. अशाच प्रकारे या मार्गावर व्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे, असेही गडकरी यांनी या वेळी सांगितले.
गडकरींनी केली पालखी मार्गाची हवाई पाहणी
देहू व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शनिवारी हवाई पाहणी केली.
हा महामार्ग ”हरित मार्ग ”करण्यात यावा या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.
श्रीसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती - इंदापूर – अकलुज – बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही गडकरी यांनी या वेळी बोलताना सांगितले.
Good news for Warkaris Dehu-Alandi to Pandharpur palkhi road will be completed next year, Gadkari’s assurance that the road will be four-lane
महत्वाच्या बातम्या
- मुस्लीम देश सूदान मध्ये सापडले तब्बल २७०० वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष!
- ईडीच्या छाप्यांनंतर मोठे शक्तिप्रदर्शन, तरीही हसन मुश्रीफांना पुढच्या चौकशीसाठी समन्स!!
- रबर स्टॅम्प काँग्रेस; रबर स्टॅम्प पंतप्रधान; हुकूमशहा शि जिंनपिंगच्या चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसीवाल्या ली कियांगकडे कमान!!
- कसबा निवडणुकीनंतर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात, निकालावर प्रसारमाध्यमांना म्हणाले…