राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना आश्वासन मिळालेलं आहे. Good News for Tamasha Artists , Permission for spectacle release from 1st February
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील तमाशा कलावंतांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून तमाशाच्या फडांना मुभा मिळणार आहे.20 जानेवारीला तमाशा पंढरी नारायणगावमधून अजित पवारांच्या बंगल्यासमोर आत्मदहन करणार,असा इशारा तमाशा फड मालकांनी दिला होता.
दरम्यान राज्य सरकारने या इशाऱ्याला गांभीर्याने घेत आज बैठक ठेवली. त्यात येत्या 1 फेब्रुवारी पासून तमाशाला मुभा देण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीत कलावंतांना आश्वासन मिळालेलं आहे.
अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.तमाशा सारखी ही कला, वारसा या संकटात लुप्त होऊन द्यायचा नसेल तर या कलेला पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक आधार देणे गरजेचे आहे.