• Download App
    शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी : पुण्यातील वढु बुद्रुक येथे उभारले जाणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकGood news for Shiva lovers: Memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj to be erected at Vadu Budruk in Pune

    शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी : पुण्यातील वढु बुद्रुक येथे उभारले जाणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक

    दरम्यान, वढु बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मागील काही वर्षापासून अनेक शिवप्रेमींची संख्या वाढली आहे.Good news for Shiva lovers: Memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj to be erected at Vadu Budruk in Pune


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे.या स्मारकाच्या कामाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे.त्यामुळे आता शिवप्रेमी आनंद व्यक्त करत आहे.

    दरम्यान, वढु बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मागील काही वर्षापासून अनेक शिवप्रेमींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी गैरसोय होत होती. अशातच या ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी होत आहे.



    स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन आणि त्यांना विश्वासात घेऊन ,तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचना यांचा आधार घेऊन काम करावं, अशा सुचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

    छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. ते महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि रक्षणासाठी संभाजी महाराजांनी दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

    Good news for Shiva lovers : Memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj to be erected at Vadu Budruk in Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!