• Download App
    पुण्यासाठी आनंदाची बातमी : 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण ; जिल्ह्यातील 540 खाजगी हॉस्पिटलचाही समावेश |Good news for Pune: Distribution of 32 thousand 61 remedicivir injections; Including 540 private hospitals in the district

    पुण्यासाठी आनंदाची बातमी : ३२ हजार ६१ रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण ; जिल्ह्यातील ५४० खाजगी हॉस्पिटलचाही समावेश

    वृत्तसंस्था

    पुणे : पुणे जिल्ह्यात ५४० खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.Good news for Pune: Distribution of 32 thousand 61 remedicivir injections; Including 540 private hospitals in the district

    रेमडिसिव्हीर इंजेक्शन्स व्हायल्स 20 व 21 एप्रिल या दोन दिवसात जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना ऑक्सीजन बेडच्या संख्येनुसार 8 हजार 100 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हाईल या पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोमेंट क्षेत्र व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरीत केल्या आहेत.



    पुणे जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 11 एप्रिलपासून 24 X 7 रेमडिसिव्हीर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

    रेमडिसिव्हीरचा काळाबाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी भागात 6 व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसिलदार यांच्या नियंत्रणाखाली स्थापन केली. त्यांमार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांचेकडील रेमडिसिव्हीरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

    त्याचसोबतच पुणे, पिंपरी महापालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबत सूचना दिल्या आहेत.

    रेमडिसिव्हीरचा तपशील संकेतस्थळावर

    दररोज प्राप्त झालेल्या रेमडिसिव्हीरचे रूग्णालयनिहाय वाटपाची रेमडिसिव्हीरच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणेच्या pune.gov.in वhttps://.pune.gov.in/corona-virus-updates/. या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

    Good news for Pune: Distribution of 32 thousand 61 remedicivir injections; Including 540 private hospitals in the district

    Related posts

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन

    राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा