वृत्तसंस्था
मुंबई : कोरोना काळात लसींचा आणि खासकरून ‘कोवॅक्सिन’ चा तुटवडा असताना त्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात पुण्यानजीकची जागा ‘भारत बायोटेक’ची सहयोगी कंपनी ‘बायोव्हॅट प्रायव्हेट लिमिटेड’ला मंजूरी द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यास मदतच होणार आहे, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. Good news : ‘covishield’ followed by ‘covaxin’ vaccine in Pune!
इंटरव्हेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या आतंरराष्ट्रीय कंपनीला 1973 मध्ये पुण्याजवळील मांजरी खुर्द गावातील 12 हेक्टर जागा पाय आणि तोंडाच्या रोगांवरील लस तयार करण्यासाठी दिली होती. कोविड-19 चा उद्रेक पाहता तेथे ‘कोवॅक्सिन’ लसीची निर्मिती करण्याची अनुमती द्यावी, विविध परवाने आणि मान्यता राज्य सरकारकडून द्यावी, अशी मागणी करणारी याचिका भारत बायोटेकच्या सहयोगी कंपनी असलेल्या कर्नाटक येथील बायोव्हेट प्रायव्हेट लिमिटेडने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली.
हा भूखंड ताब्यात देण्यास दिरंगाई झाल्यामुळे प्लांटमध्ये युनिट आणि यंत्रसामग्री सध्या पडून आहे. या युनिटचा कोवॅक्सिन लस निर्मितीसाठी उपयोग केला जाऊ शकतो. तसेच कंपनी या जागेबाबत भविष्यात कोणताही हक्काचा दावाही करणार नाही, भूखंडाचा उपयोग केवळ हे वॅक्सिन तयार करण्यासाठीच करण्यात येईल, असं हमीपत्रही याचिकाकर्त्या कंपनीने न्यायालयात सादर केले.
Good news : ‘covishield’ followed by ‘covaxin’ vaccine in Pune!
महत्त्वाच्या बातम्या
- Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता
- धक्कादायक!कोरोना लसीचे २ डोस घेऊनही अभिनेते मोहन जोशींना झाली कोरोनाची लागण
- अमेरिकेतील भीषण चित्र, न्यूयॉर्कमध्ये साडेसातशे मृतदेह अजूनही अंत्यविधीच्या प्रतिक्षेत, रस्त्यावर उभ्या ट्रकमध्ये आहेत मृतदेह
- मुस्लिमांची लोकसख्या कमी करण्यासाठी चीन सरकारचा फतवा, उईगर मुस्लिम महिलांना गर्भनिरोधक साधने वापरण्याची सक्ती
- मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभिर्याने घेतला नाही, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याची विनायक मेटे यांची मागणी