विशेष प्रतिनिधी
नाशिक : एकादशीच्या पुण्यपावन पर्वानिमित्त आज महायुतीच्या फडणवीस सरकार मधले ज्येष्ठ मंत्री आणि नासिक येथील कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आज रामतीर्थ गोदावरी तीर्थक्षेत्र येथे येऊन रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या महाआरती कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
हजारो भाविकांच्या साक्षीने त्यांनी गोदावरीचे पूजन करून गोदावरीस महाआरती समर्पण केली. गोदावरीला नमस्कार घालून त्यांनी “गोदावरी या वर्षाच्या आधीच मी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करेन!!, असे शब्द उच्चारून ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य गोदावरी मातेने मला देवो!!, अशी प्रार्थना केली.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी गिरीश महाजन यांचा सत्कार केला. उपाध्यक्ष नृसिंह कृपादास यांनी स्वागत केले. सचिव मुकुंद खोचे यांनी मंत्री महोदयांना आरती संदर्भातील संपूर्ण माहिती सांगितली. समितीचे विश्वस्त प्रफुल्ल संचेती आणि वैभव क्षेमकल्याणी यांनी आभार व्यक्त केले. हजारो नागरिकांनी गिरीश महाजन यांचे रामतीर्थावर अभिनंदन केले.
Godavari Maha Aarti performed at Ram Tirtha by Girish Mahajan
महत्वाच्या बातम्या
- 10 आमदारांच्या बळावर विरोधी पक्षनेते पदासाठी पवारांचा “मोठ्ठा डाव”; पण ठाकरे + काँग्रेसला पटतचं नाय!!
- Bhandara : भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
- Muhammad Yunus : मोहम्मद युनूस राजीनामा देतील? बांगलादेशात निषेधाचे आवाज उठू लागले
- Guillain Barré : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमची एकूण रूग्ण संख्या ६७ वर पोहचली