विशेष प्रतिनिधी
नाशिक : रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आज आर्ट ऑफ लिविंग ब्लॉगर्स असोसिएशन, इस्कॉन यांच्या साहाय्याने रामतीर्थ येथे स्मिता गोदावरी स्वच्छता अभियान राबविले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 25 जानेवारी रोजी सकाळी गोदावरी स्वच्छतेचे अभियान पूर्ण केले. या स्वच्छता अभियानात 300 युवक – युवतींनी उत्साहात सहभाग नोंदवला.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव मुकुंद खोचे यांनी समितीच्या आगामी उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. अध्यक्ष जयंत गायधनी आणि सदस्य चिराग पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन केले. शिवाजीराव बोंदार्डे यांनी स्वच्छता अभियान कसे राबवावे याचे मार्गदर्शन केले.
इस्कॉनचे ब्रह्मचारी प्रभू नृसिंह कृपादास यांनी आशीर्वाद दिले. ब्लॉगर्सच्या अध्यक्षा कु. पटेल, अद्वैत, शुक्ल, प्रणव बागुल, हितेश चंदवानी, चैतन्य, मोक्ष यांनी युवकांचे नेतृत्व केले .
Godavari cleanliness campaign
महत्वाच्या बातम्या
- Jalgaon : जळगाव रेल्वे अपघातात ४ परदेशी नागरिकांचाही मृत्यू
- Devendra Fadnavis मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्राची 15.70 लाख कोटींच्या करारांची भरारी, याचीच विरोधकांना पोटदुखी; फडणवीसांचा “पंच”!!
- टप्प्याटप्प्याने झाली विरोधकांची हत्यारे बोथट; स्वतःचे पक्ष वाचवण्यासाठी तरी ठाकरे + पवार आहेत का सिरीयस??
- Trumps : ट्रम्प यांच्या स्थलांतरिताबाबतच्या निर्णयांवरील अंमलबजावणी सुरूवात