मराठा आरक्षणासाठी नवा आयोग नेमण्याच्या महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या देत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल करत आपण सामना वाचणेच सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले. Giving the slogan of self-reliance, Nana Patole’s Mahavikas Aghadi was slammed
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणासाठी नवा आयोग नेमण्याच्या महाविकास आघाडी सरकारला कानपिचक्या देत कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल करत आपण सामना वाचणेच सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय करता येईल यासाठी सध्या राज्य सरकार विविध अंगांनी विचार करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी गायकवाड आयोगानंतर आखणी एक नवीन आयोग बसवण्याच्या विचारात आहे. या मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारला सुनावले आहे. समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. त्यामुळं नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, असं म्हणत पटोले यांनी सरकारला सुनावले आहे.
टोले म्हणाले, संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना वाचणं आम्ही बंद केले आहे. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसºयांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित राऊत यांना माहिती नसावे .
पुढची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगताना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात निवडणूक हा प्रत्येक राजकीय पक्षाचा भाग असतो. प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने तयारी करत असतात. तशीच काँग्रेसही पूर्ण राज्यात तयारी करतो. इंटक बरोबर बैठक झाली आहे.
Giving the slogan of self-reliance, Nana Patole’s Mahavikas Aghadi was slammed
महत्वाच्या बातम्या
- अतिदक्षता विभागातील कोरोना बाधीत रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या, टेलिफोनच्या वायरने घेतला गळफास
- मुलांमध्ये कोरोना वाढला, पुण्या पाठोपाठ कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमधील 14 मुली कोरोना पॉझिटिव्ह
- सुनेचा छळ केल्याप्रकरणी कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांवर गुन्हा
- पोलंडमध्ये दुसऱ्या महायुद्धातील महाकाय बॉम्बचा भीषण स्फोट
- मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्या मुलाची तत्परतेने मंत्रीपदी नियुक्ती केली तसाच बहुजन युवकांचा नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावा, गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- अमेरिकेत तुरुंगातही कोरोना शिरला ; वर्षभरामध्ये 2700 कैद्यांचा मृत्यू
- आंध्र, राजस्थानचा हा आदर्श मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार का?