• Download App
    Stop Political Gains": Girish Mahajan Slams Rohit Pawar Over Ajit Pawar Crash VIDEOS अजित पवार विमान अपघात प्रकरण; 'राजकीय पोळी भाजण्याचे काम थांबवा', अकलेचे तारे तोडू नका, गिरीश महाजनांचा रोहित पवारांना टोला

    Girish Mahajan : अजित पवार विमान अपघात प्रकरण; ‘राजकीय पोळी भाजण्याचे काम थांबवा’, अकलेचे तारे तोडू नका, गिरीश महाजनांचा रोहित पवारांना टोला

    Girish Mahajan

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Girish Mahajan उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकांना आता राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादांच्या अपघाताचे कोणीही गलिच्छ राजकारण करू नये, आपल्या राजकीय फायद्यासाठी चुकीचे विधाने करणे थांबवावे, अशा शब्दांत महाजन यांनी नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा साधला.Girish Mahajan

    गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, या अपघाताची सखोल चौकशी व्हावी ही सर्वांचीच भावना आहे आणि त्यानुसार राज्य व केंद्र सरकारने तातडीने आदेश दिले आहेत. कोणी म्हणते बॉम्ब ठेवला, तर कोणी पायलटच्या माध्यमातून घातपाताचा संशय व्यक्त करतेय. अशा प्रकारे आपापल्या अकलेचे तारे तोडणे चुकीचे आहे. या प्रकरणाच्या चौकशीत 100 टक्के पारदर्शकता असून संभ्रमाची कोणतीही शक्यता नाही. जर कोणाला शंका असेल तर त्यांनी खुशाल दिल्लीला जाऊन अपील करावे किंवा तक्रार द्यावी.Girish Mahajan



    रोहित पवार विरुद्ध भाजप युवा मोर्चा

    दुसरीकडे, भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. रोहित पवार यांच्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळेच हा अपघात झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. रोहित पवार यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत भाजपकडून ‘गलिच्छ राजकारण’ सुरू असल्याची टीका केली आहे.

    सोलनकर काय म्हणाले आपल्या पत्रात?

    सोलनकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील शेठफळ गडे येथे रोहित पवार यांच्याशी एक साखर कारखाना आहे. या कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ व त्वचेच्या तक्रारी भेडसावत आहेत. त्याचा शेतीवरही परिणाम होत आहे. अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी बारामती परिसरात या कारखान्याच्या धुरामुळे कमी दृश्यमानता होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का? याची वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक आहे. विशेषतः रोहित पवार यांनी स्वतः कारखान्याचा धूर विमानतळासाठी अडथळा ठरतो की नाही याचे सादरीकरण करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

    जय पवारांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष

    या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्र जय पवार सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते नेमकी काय भूमिका मांडणार आणि अपघाताबाबत कुटुंबाचे काय म्हणणे आहे, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

    Stop Political Gains”: Girish Mahajan Slams Rohit Pawar Over Ajit Pawar Crash VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Avinash Jadhav : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळा; मनसेच्या अविनाश जाधवांचा आरोप

    ‘‘पीएमपीएमएल’’ कर्मचाऱ्यांसाठी ‘‘गुड न्यूज’’; सातव्या वेतन आयोगातील थकीत रक्कम मिळणार लवकरच!!

    गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ रेणापूरच्या पंचायत समितीत भाजपच्या मदतीने मनसेच्या सभापती!!