प्रतिनिधी
मुंबई : गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षातली खदखद आणखीनच बाहेर आली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुलाम नबी आझाद यांच्या पुढे जाऊन काँग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस म्हणजे काय मुघल सल्तनत आहे का?, गांधी परिवाराने “दिले” म्हणजे सगळ्यांनी खुश झाले पाहिजे!! हा काय प्रकार आहे??, असे एका पाठोपाठ एक परखड सवालांचे शरसंधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.Ghulam Nabi Azad to form New Political Party First branch in Kashmir, many Congress leaders also left the party
काँग्रेसमध्ये गेल्या 24 वर्षांपासून जे नॉमिनेशन कल्चर सुरू झाले आहे, म्हणजे वरून नेमणूक करायच्या लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत हे ताबडतोब बंद झाले पाहिजे. कोणत्याही कृत्रिम नकाशाच्या आधारे नियुक्त होऊ नये तेवढीच आमची मागणी होती. परंतु, तीच मान्य करण्यात येत नसेल तर उपयोग काय असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. g23 गटाने आवाज उठवला तो आधी उठवला नाही ही आमची चूक झाली, अशी कबुली देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
परंतु काँग्रेसमध्ये तू तू मै मै असे करण्यापेक्षा लोकशाही पद्धतीने निवडणुका घेऊन काँग्रेस पक्ष वाचवला पाहिजे. यामध्ये सगळे 18 वर्षांचे कार्यकर्ते निवडून आले तरी हरकत नाही पण किरकोळ असे वयाचे निकष लावून एखाद्याला बाजूला करणे आणि आपल्याला हव्या तशा नेमणूका करणे हे अजिबात योग्य नाही. कारण काँग्रेसकडे स्वतःची घटना आहे. निवडणूक आयोगाकडे त्याची नोंद आहे. ही कुठल्याही व्यक्तिगत कुटुंबाच्या मालकीची संस्था आणि पक्ष नाही राहुल गांधी तरी काय एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत ना!! असे परखड बोल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी ऐकवले आहेत.
काँग्रेस मुक्त भारत मोदींचे स्वप्न अयोग्य
काँग्रेस मुक्त भारत ही मोदींची घोषणा लोकशाही विरोधी आहेत परंतु काँग्रेस मुक्त भारत झाला तर त्याला एकटे मोदीच कसे जबाबदार असतील?? त्याला काँग्रेस पक्ष देखील जबाबदार नसेल का?? कारण स्वतःला वाचवण्यासाठी जर काँग्रेसने काहीच केले नाही तर ती जबाबदारी फक्त मोदींची कशी राहील??, असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मोदी – शहांची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी काँग्रेसने पर्याय दिलाच पाहिजे आणि काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी फक्त आणि फक्त लोकशाही मार्गाने निवडणुका घेऊन पक्षाची बांधणी करणे हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पी. व्ही. नरसिंहराव यांनी तिरुपती अधिवेशनात काँग्रेस कार्यकारिणीची निवडणूक घेतली होती. त्यानंतर सीताराम केसरी यांनी निवडणूक कलकत्त्यामध्ये घेतली होती. परंतु, सोनिया गांधी आल्यानंतर निवडणूक झालेली नाही. 10 वर्षे सत्तेवर असताना आम्ही आवाज उठवायला हवा होता. तो उठवला नाही ही चूक झाली. पण म्हणून इथून पुढे देखील निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि वरून नेमणूक करून नॉमिनेशन कल्चर मजबूत करायचे हे योग्य नसल्याचे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस हायकमांडला सुनावले आहे.
Ghulam Nabi Azad to form New Political Party First branch in Kashmir, many Congress leaders also left the party
महत्वाच्या बातम्या
- रोहित पवार ईडी चौकशी : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानशी आर्थिक संबंध, मनी लॉड्रिंगचा संशय!!
- One Nation, One Charger : मोदी सरकारची आयडियेची भन्नाट कल्पना!!; अंमलबजावणी कधी?? केव्हा?? कशी??
- गणेशोत्सव स्पेशल : एसटीच्या 3500 गाड्या फुल्ल!!; पण खासगी ट्रॅव्हल्स कडून प्रवाशांची दाम दुपटीने लूट!!
- पवन कल्याण, ज्युनिअर एनटीआर, नितीन कुमार रेड्डी यांच्या सदिच्छा भेटीसाठी; भाजप दक्षिण दिग्विजयाचा मार्ग टॉलिवूड मधून!!