जर्मनीतील वेगवेगळे व्हॅक्युम पंप उत्पादन करणारी कंपनी बेकर इंटरनॅशनलची आर्थिक उलाढाल २०० दक्षलक्ष (युराे)ची आहे. सदर कंपनी आता तिचे कार्यक्षेत्र भारतात विस्तरणार असून बेकर इंडिया या नवीन कंपनीच्या माध्यमातून ती आगामी काळात दहा काेटींची गुंतवणुक करणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे – व्हॅक्यूम आणि वायवीय (प्युमॅटिक) उपकरणे तयार करणारी देशातील जागतिक उत्पादक कंपनी बेकर जीएमबीएच इंटरनॅशनलने भारतात व्यवसाय विस्तारीकरणाचे निश्चित केले आहे. सदर कंपनीचे मुख्यालय पुण्यात राहणार असून जीइबीआर बेकर इंडिया व्हॅक्यूम पंप प्रा.लि. या नवीन कंपनीच्या माध्यमातून एकूण दहा काेटींची गुंतवणुक करणार असल्याची माहिती कंपनीचे विक्री व्यवस्थापक हॅन्स सिस्ला व कंपनीचे भारतातील सीईओ मिलिंद भालेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.German Compani Bekar International will Invest 10 Cr in India
भालेराव म्हणाले, जर्मनीची असलेली मुळ कंपनी बेकर इंडियाचे मुख्यालय पुण्यातील भुकूम परिसरात राहणार असून याठिकाणी उत्पादन कक्ष (असेंब्ली युनिट) उभारण्यात आले आहे. याठिकाणी अत्याधुनिक गाेदाम, चाचणी सुविधा, सेवा केंद्र व प्रत्याक्षिकासह प्रशिक्षण कक्ष आहे. नवीन कंपनीच्या माध्यमातून कंपनीची कार्यक्षमता वाढविण्यास मदत हाेणार आहे.
ऑईल लेस व्हॅक्यूम पंप, ऑईल ल्युब्रिकेटेड व्हॅक्यूम पंप्स, साइड चॅनल ब्लाेअर्स, काॅम्बाइंड व्हॅक्यूम प्रेशर पंप कंपनी उत्पादन करत असून आणखी वेगवेगळया प्रकारचे पंप बाजारात लवकरच आणले जातील. पेपर उद्याेग, पॅकेजिंग व फूड प्राेसेसिंग, लाकूडकाम, प्रिटिंग, वैद्यकीय तंत्रज्ञान, प्लाॅस्टिक, इलेक्ट्राॅनिक उद्याेग आदी ठिकाणी सदर पंप उपकरणांचा वापर हाेताे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यात ; गहू, हरभरा, कांदा पिकाचे मोठे नुकसान
- महापाैरांचे कार्यालयात शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल
- Women’s Day : झारखंड काँग्रेस महिला आमदाराचा अनोखा अंदाज; घोडेस्वारी करत पोहोचल्या विधानसभेत पहा व्हिडिओ
- Thank you Modiji : युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांना भारताची मदत ! विद्यार्थ्यांनी मानले